Loksabha 2019 : आघाडीकडून साधेपणात खासदार महाडिकांचा अर्ज दाखल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 एप्रिल 2019

कोल्हापूर - काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांच्या महाआघाडीकडून कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठी सोमवारी ( ता .1) खासदार धनंजय महाडिक यांनी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार राजू शेटटी, आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार हसन मुश्रीफ, जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रकाश आवाडे उपस्थित होते.

कोल्हापूर - काँग्रेस - राष्ट्रवादी व मित्र पक्षांच्या आघाडीकडून कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठी आज खासदार धनंजय महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार राजू शेट्टी, आमदार हसन मुश्रीफ, कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील, जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रकाश आवाडे उपस्थित होते. तर यावेळी डमी अर्ज म्हणून अरुंधती महाडिक यांचाही अर्ज भरण्यात आला.

यावेळी त्यांच्यासोबत महापौर सरिता मोरे, आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार के. पी. पाटील, प्रा. जयंत पाटील आदी उपस्थित होते. 

दुपारी साडेबाराच्या सुमारास आमदार मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष के. पी. पाटील व सर्व नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात हजेरी लावली. यावेळी उपस्थित होते. खासदार महाडिक यांच्यासोबतच कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन .पाटील हे देखील जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. आमदार संध्यादेवी कुपेकर, अरुंधती महाडिक, प्रकाश आवाडे हे देखील उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोठी सिक्‍युरिटी तैनात असल्याने सर्वच लोकप्रतिनिधी गेटबाहेर थांबून होते. खासदार राजू शेट्टी वगळता सर्व नेते आल्यानंतर सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला. खासदार शेट्टी येणार असल्याने मधल्या वेळेत अरुंधती महाडिक यांचा अर्ज भरण्यात आला. 

खासदार धनंजय महाडिक हे वारंवार खासदार शेट्टी यांच्याशी संपर्क करुन ते किती वेळात पोहोचणार, याचा ते अंदाज घेत होते. अखेर आमदार मुश्रीफ यांच्या सुचनेनंतर अर्ज दाखल करण्यासाठी सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचताच, खासदार शेट्टींचे आगमन झाले. यानंतर भगवान काटे यांना बाहेर बोलावून खासदार शेट्टी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. अर्ज भरण्याची सर्व प्रक्रिया आधिच पूर्ण केल्याने 20 मिनिटात अर्ज दाखल करण्यात आला. 

Web Title: Loksabha 2019 Kolhapur Lok Sabha Constituency MP Mahadik fill form