Loksabha 2019 : राजारामबापूंच्या नातवाकडून वसंतदादांच्या नातवाला शुभेच्छा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

सांगली - वसंतदादा आणि राजारामबापू पाटील या जिल्ह्याच्या दिग्गज नेत्यांच्या राजकीय वादाची नेहमीच चर्चा होत असते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत स्वाभीमानीचे उमेदवार विशाल पाटील यांनी या वादाला नव्याने फोडणी दिली. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा वाद इतिहासजमा झाला असे सांगत पडदा टाकल्यानंतर त्यांचे चिरंजीव राजवर्धन यांनीही तीच री ओढत विशाल यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

जयंत पाटील यांचे चिरंजीव व राजारामबापूंचे नातू राजवर्धन यांनी वसंतदादांचे नातू आणि स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांना फेसबुकद्वारे या शुभेच्छा दिल्या आहेत. फेसबुक वॉलवर ते लिहतात, महाराष्ट्राच्या राजकारणात सांगलीने आपले महत्व सिद्ध केले आहे. मग ते स्वर्गीय वसंतदादांच्या रूपाने असो किंवा लोकनेते राजारामबापूंच्या रूपाने असो. सांगली जिल्हा नेहमी चांगल्या लोकांच्या आणि चांगल्या विचारांच्या मागे भक्कम उभा राहतो.

आजकाल माझ्या वाचण्यात असे आले की गेल्या चार दशकापासून दादा-बापू वाद या जिल्ह्यातील चर्चेचा विषय आहे, आणि याच मुद्द्याच्या भोवती सांगलीचे राजकारण फिरत असते. काही वैचारिक मतभेद असतीलही पण व्यक्तीश: मला यात काही वाद होता असं वाटत नाही, कारण आजवर आमच्या घरी मी कधीच हा विषय ऐकला नाही. आज स्वर्गीय वसंतदादांची तिसरी पिढी म्हणून विशाल पाटील हे सांगली लोकसभेची निवडणूक लढवत असताना लोकनेते राजारामबापूंची तिसरी पिढी म्हणून त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देणे हे मी व माझे बंधू प्रतिकदादा आमचं कर्तव्य समजतो. म्हणून स्वर्गीय वसंतदादांच्या नातवाला, स्वर्गीय राजारामबापूंच्या नातवांकडून मनापासून शुभेच्छा...! 

Web Title: Loksabha 2019 Rajvardhan Patil greets Vishal Patil