Loksabha 2019 :भाजपकडून सांगलीत तीन तालुकाध्यक्षांना पक्षविरोधी कारवाईप्रकरणी नोटीस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

सांगली - भारतीय जनता पक्षाच्या तीन तालुका पदाधिकाऱ्यांना पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. भाजपचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारात या तिघांचा सहभाग नसल्याचे या नोटिसीत नमूद करण्यात आले आहे.

नोटीस बजावण्यात आलेल्या मध्ये खानापूर तालुकाध्यक्ष सुहास पाटील, आटपाडीचे तालुकाध्यक्ष प्रभाकर पुजारी आणि खानापूर तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष संग्राम माने यांचा समावेश आहे. जिल्हा भाजपचे संघटन सरचिटणीस सुरेंद्र चौगुले यांनी ही नोटीस बजावली आहे. 

भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचाराच्या नियोजन बैठकीस गैरहजर राहिल्याबद्दल भाजपकडुन या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यातून सांगलीत भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी आणि वाद समोर येत आहे. 

Web Title: Loksabha 2019 Sangli BJP action against three Taluka President