Loksabha 2019 :  सांगली मतदार संघात दुपारी सव्वाबारापर्यंत 20 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

सांगली - सांगली लोकसभा मतदार संघात दुपारी सव्वाबारापर्यंत 19.68 टक्के मतदान झाले. जिल्ह्यात सर्वत्र चुरशीने मतदान सुरु असून मतदान यंत्रात बिघाडाच्या तक्रारींचे प्रमाण मोठे आहे. सांगली शहरात दोन ठिकाणी तर जत, कवठेमहांकाळ तालुक्‍यात अशा स्वरुपाच्या तक्रारी आल्या आहेत. 

विधानसभा मतदारसंघ मतदान टक्केवारी अशी - (दुपारी सव्वाबारापर्यंत)

मिरज 18.48, सांगली 20.57, पलूस 21.23, खानापूर 17.45, तासगाव कवठेमहांकाळ 21.08, जत 19.30, 

देशिंग (ता. कवठे महांकाळ) येथे मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याची तक्रार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून दोन तास बंद पडल्याने मतदारांना दोन तास मतदान केंद्रावर बसून राहावे लागले. मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्या होत्या पण मशीन बंद असल्याने अनेक जण मतदान न करताच माघारी परतले. 

आरग (ता.मिरज) येथे सकाळी सव्वादहा ते पावणेअकरापर्यंत क्रमांक 241 वर मशिन बंद पडले. गावातील अन्य एका केंद्रावरही साडेनऊच्या सुमारास दहा मिनिटे बंद पडले. मशिन बदलण्यात येणार होते मात्र त्यानंतर ते पुन्हा सुरु झाल्याने तेच मशीन ठेवून मतदान सुरु झाले. 

बिऊर (ता. जत) येथे मतदान केंद्रावर राजकीय कार्यकर्त्यांत वादावादी झाली. सांगलीत त्रिकोणी बागेजवळील केंद्रात यंत्रात बिघाड झाल्याची तक्रार आहे.

Web Title: Loksabha 2019 Sangli Constituency voting