Loksabha 2019 : शेतीला पाणी भाजपमुळेच शक्‍य 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

आटपाडी - विदर्भ अनुशेषच्या बाहेर जाऊन केंद्राकडून बळीराजा संजीवनी योजनेतून कृष्णा खोरे महामंडळासाठी भरीव निधी आणला. त्यामुळे टेंभूसह उपसा सिंचन योजना सहा महिन्यात मार्गी लागेल. हे युतीचे सरकारच करू शकते, अशी भूमिका भाजपचे उमेदवार खासदार संजय पाटील यांनी मांडली. 

आटपाडी - विदर्भ अनुशेषच्या बाहेर जाऊन केंद्राकडून बळीराजा संजीवनी योजनेतून कृष्णा खोरे महामंडळासाठी भरीव निधी आणला. त्यामुळे टेंभूसह उपसा सिंचन योजना सहा महिन्यात मार्गी लागेल. हे युतीचे सरकारच करू शकते, अशी भूमिका भाजपचे उमेदवार खासदार संजय पाटील यांनी मांडली. 

शेटफळे येथील सिद्धनाथ मंदिरात नारळ फोडून तालुक्‍यात प्रचार प्रारंभ केला. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख, दीपक शिंदे, सभापती हर्षवर्धन देशमुख, पंचायत समिती सदस्य दादासाहेब मरगळे, विनायकराव मासाळ, अनिल पाटील, सरपंच ओंकार जवळे उपस्थित होते. शेटफळे, तडवळे, आटपाडीत सभा झाल्या. 

खासदार पाटील म्हणाले, ""पाणीपट्टीचा 81-19 चा ऐतिहासिक निर्णय घेतला. भविष्यात आवर्तनाचे नियोजन, ठिबक, फळप्रक्रिया उद्योग उभारणीला प्राधान्य दिले जाईल. या कामाच्या जोरावरच तुमच्यासमोर आलो आहे. आतापर्यंत अनुशेषाच्या नावाने अडवणूक आणि पिळवणूक केली. दुष्काळी भागाला वंचित ठेवले. भाजप सरकार गप्प राहिले नाही. मार्ग काढला. केंद्राकडे पाठपुरावा केला. बळीराजा योजनेत समावेश केला. बाराशे कोटीवर निधी मिळाला. सहा महिन्यात योजना मार्गी लागेल.'' 

श्री. देशमुख म्हणाले, ""आघाडी सरकारने दहा वर्षे अनुशेष नावाखाली टेंभू योजनेचे घोंगडे भिजत ठेवले, मात्र भाजपने केंद्राकडून उपसा योजनेला मोठा निधी दिला. अनुशेष काल होता मग आज कोठे गेला. निवडणूक गांभीर्याने घ्या. टीकाटिप्पणीला महत्व देऊ नका. सरकारच्या कामाची तुलना करा आणि निर्णय घ्या.'' 

मोहनराव मोकाशी, हणमंतराव मोकाशी, गौरीहार पवार यांची भाषणे झाली. प्रकाश गायकवाड, रामहरी गायकवाड, पांडुरंग गायकवाड, दत्तात्रय कांबळे, शशिकांत देशमुख उपस्थित होते. विनायक मासाळ वंचित बहुजन आघाडीत होते. त्यांनी यावेळी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. 

Web Title: Loksabha 2019 Sanjaykaka Patil comment