Loksabha 2019 : मला शेतकऱ्यांचा नेता नव्हे, तर शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात - ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

इचलकरंजी - ‘‘मी नेहमीच शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडत आलो आहे, पण मला कोण शेतकऱ्यांचा नेता म्हणत नाही, तर शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी फक्त शिवसेना उभी राहिली आहे.’’ असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केले. 

इचलकरंजी - ‘‘मी नेहमीच शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडत आलो आहे, पण मला कोण शेतकऱ्यांचा नेता म्हणत नाही, तर शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी फक्त शिवसेना उभी राहिली आहे.’’ असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केले. 

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ लक्ष्यभेद सभा येथील नाट्यगृह चौकात झाली. यावेळी श्री. ठाकरे बोलत होते. 

‘‘उद्योगवाढीसाठी प्रयत्न करणारा शिवेसना पक्ष आहे. त्यामुळे वस्त्रोद्योगाला पुन्हा चांगले दिवस आणण्यासाठी धैर्यशील माने यांच्या रूपाने भगवा सूर्य लोकसभेत पाठवा,’’ असे आवाहन श्री. ठाकरे यांनी येथे केले.  या मतदारसंघात पंचगंगा नदी प्रदूषणासारखे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. ते सोडविण्यासाठी पहिला खासदार बदला. त्यामुळे सर्व प्रश्‍न नक्की सुटतील, असा हल्लाबोलही श्री. ठाकरे यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यावर केला.

ते म्हणाले, ‘‘विरोधकांकडून केवळ घाणेरडे राजकारण सुरू आहे. त्यांच्याकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नसून ते आतापासूनच एकमेकांचे पाय ओढण्याचे काम ते करत आहेत.’’

धैर्यशील माने म्हणाले, ‘‘छातीवर बिल्ला लावून स्वाभिमानी होता येत नाही. रक्तातच स्वाभिमान असावा लागतो. आता जनतेने ही निवडणूक हातात घेतली असल्याने बहुजन समाजाचाच खासदार होणार आहे.’’

आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्षा अलका स्वामी, जय शिवराय संघटनेचे शिवाजी माने, विकास देशमुख, ऋषभ जैन आदींची भाषणे झाली. सभेचे नियोजन रवींद्र माने यांनी केले. आमदार नीलम गोऱ्हे, राजेश क्षीरसागर, उल्हास पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील-सरुडकर, अशोक स्वामी, मुरलीधर जाधव, सुरेश पाटील, तानाजी पोवार, महादेव गौड आदी उपस्थित होते. आण्णा बिल्लुरे यांनी सूत्रसंचालन केले.

धैर्यशील यांना कौतुकाची थाप
आपल्या भाषणाचा समारोप करताना श्री. ठाकरे यांनी धैर्यशील माने यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. यापुढे आपण कायम धैर्यशीलच्या पाठीशी राहू, असे श्री. ठाकरे सांगताच सभेत एकच जल्लोष झाला.

वारणेला विरोध हे शेट्टींचे षड्‌यंत्र 
इचलकरंजी शहरासाठीच्या वारणा योजनेला विरोध करण्याचे षड्‌यंत्र खासदार राजू शेट्टी यांचेच असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी येथे केला.

Web Title: Loksabha 2019 Uddhav Thackeray comment in Ichalkaraji