श्रीनिवास पाटील 'येथे'ही उदयनराजेंपूढे सरस

उमेश बांबरे
Friday, 29 November 2019

पाेटनिवडणुकीच्या निकालानंतर सर्वच उमेदवारांना एक महिन्याच्या आत निवडणुकीत झालेला खर्च निवडणूक विभागाकडे सादर करायचा होता. हा एक महिन्याचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच उमेदवारांनी निवडणुकीत केलेला खर्च जमा केला आहे.

सातारा : सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढलेल्या उमेदवारांनी आपला खर्च निवडणूक विभागाकडे सादर केला आहे. निवडणूक आयोगाने 70 लाखांपर्यंत खर्च मर्यादा ठेवली होती. प्रत्यक्षात सर्व सातही उमेदवारांचा मिळून एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये खर्च केल्याची माहिती निवडणूक विभागाकडे देण्यात आली आहे.

सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
 
विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणुक झाली. या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागल्या होत्या. कारण या निवडणुकीत भाजपचे नेते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांनी लक्ष घातले होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार एकाकी झुंज देत पक्षाच्या उमेदवारासाठी झटत होते. या निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा 70 लाख रुपये होती. 

सात जणांनी लढविली पाेटनिवडणुक

शासकीय दरबारी जमा केलेल्या अधिकृत खर्चाची आकडेवारीनुसार उमेदवारांकडून कमी खर्च करण्यात आला आहे. या निवडणुकीत एकूण सात उमेदवार रिंगणात होते. त्यात श्रीनिवास पाटील (राष्ट्रवादी), उदयनराजे भोसले (भाजप), चंद्रकांत खंडाईत (वंचित बहुजन आघाडी), व्यंकटेश्‍वर स्वामीजी (हिंदुस्थान जनता पार्टी), ऍड. शिवाजीराव जाधव ऊर्फ कविवर्य सुशीलकुमार भोसरेकर, अलंकृता अभिजित बिचुकले, शिवाजी भोसले (सर्व अपक्ष) यांचा समावेश होता.
 
निकालानंतर सर्वच उमेदवारांना एक महिन्याच्या आत निवडणुकीत झालेला खर्च निवडणूक विभागाकडे सादर करायचा होता. हा एक महिन्याचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच उमेदवारांनी निवडणुकीत केलेला खर्च जमा केला आहे.

एकूण खर्च एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये

सातही उमेदवारांचा मिळून अधिकृत खर्च हा एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक खर्च श्रीनिवास पाटील यांच्याकडून झाला आहे. त्यांनी 53 लाख 75 हजार 964 रुपये खर्च दाखविला आहे. उदयनराजे भोसलेंनी 53 लाख 70 हजार 697 रुपये खर्च दाखविला आहे. चंद्रकांत खंडाईत यांनी एक लाख 96 हजार 559 रुपये, व्यंकटेश्‍वर स्वामीजींनी 12 हजार 700 रुपये, ऍड. शिवाजीराव जाधव यांनी 28 हजार 50 रुपये, अलंकृता अभिजीत बिचुकलेंनी 13 हजार, तर शिवाजी भोसले यांनी 35 हजार 300 रुपये खर्च दाखविला आहे.

साताऱयात अतिक्रमणांचे साम्राज्य ; राजेंच्या सूचनांकडे दुर्लक्ष

सर्वाधिक खर्च नाेंद झालेल्या श्रीनिवास पाटील यांना या निवडणुकीत सहा लाख 31 हजार 572 मते मिळाली आहेत. त्यापाठाेपाठ दुसऱ्या क्रमांकाचा खर्च केलेल्या उदयनराजे भोसलेंना पाच लाख 45 हजार 703 मते मिळाली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Byelection Candidates Submited Their Expenditure To The Election Department