Loksabha 2019 : भाजप सरकार उलथवून टाका - उदयनराजे भोसले

कोयनानगर - प्रचारसभेत बोलताना उदयनराजे भोसले. समोर नागरिक.
कोयनानगर - प्रचारसभेत बोलताना उदयनराजे भोसले. समोर नागरिक.

कोयनानगर - ‘‘कुणी कितीही मिशीवर पीळ मारून आडवे येऊ दे. आता भाजप सरकार उलथवून टाका,’’ असे आवाहन सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी, काँग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. 

कोयनानगर येथे प्रचारार्थ जाहीर सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. माजी सभापती सत्यजितसिंह पाटणकर, उपसभापती राजाभाऊ शेलार, नरेश देसाई, पंचायत समितीचे सदस्य बबनराव कांबळे, माजी सभापती नाना गुरुव, विष्णू सपकाळ, पूजा कदम, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा स्नेहल जाधव, बाळासाहेब कदम, मनीष चौधरी उपस्थित होते.

उदयनराजे म्हणाले, ‘‘कोयना विभागात बहारदार निसर्ग आहे. पर्यटनातून विभागाचा विकास होतो आहे. त्यामुळे कोयना विभागातील राजकीय नेत्यांनी पर्यटन वाढवून त्याचे संवर्धन केले पाहिजे. त्यामुळे कोयना विभागातील जनतेच्या रोजगाराचे काय, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या राजकीय नेत्यांनी प्रश्न उपस्थित न करता तो स्वतः निर्माण करण्याची क्षमता ठेवावी. 

रोजगाराचा प्रश्न उपस्थित करून रडत बसू नये. केवळ जाहिरातीसाठी योजना तयार करणारे हे घोटाळेबाज सरकार आहे. देशात हुकूमशाही नांदत आहे. ती मोडीत काढण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे.’’ 

सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, कोयना विभाग विविध समस्यांनी ग्रासलेला भाग आहे. जनतेच्या प्रश्नावर सरकारला कळवळा नसून पाच वर्षांत अभयारण्यातून १४ गावे वगळली नाहीत, ते ६० दिवसांत काय वगळणार? चांगल्या गोष्टीला विरोध करण्याचे काम तालुक्‍याच्या लोकप्रतिनिधींकडून झाले आहे. लोकप्रतिनिधींकडून विभागात रोजगार वाढीसाठी प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाटण तालुक्‍यातून उदयनराजेंना मताधिक्‍य देणार आहे.

या वेळी उपसभापती राजाभाऊ शेलार, नरेश देसाई यांची भाषणे झाली. उपसभापती शेलार यांनी स्वागत केले. बाळासाहेब कदम यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com