लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीनिमीत्त भव्य मिरवणुक  

चंद्रकांत देवकते
रविवार, 12 ऑगस्ट 2018

सोलापूर : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती उत्सव समिती मोहोळ यांच्या वतीने आण्णाभाऊ साठे यांच्या 98 व्या जयंतीनिमीत्त त्यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीचे उदघाटन माजी आमदार राजन पाटील यांनी केले. यावेळी, व्यासपिठावर नगरसेवक संतोष खंदारे, दत्तात्रय खवळे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख दादासाहेब पवार, दलितमित्र मधुकर लोखंडे गुरूजी, उद्योजक संतोष वायचळ, दलित स्वयंसेवक संघाचे प्रांताध्यक्ष मिलींद अष्टुळ, अॅड विनोद कांबळे, जयंती उत्सवाचे अध्यक्ष महादेव गायकवाड, शांतीकुमार अष्टुळ, यशोदा कांबळे, सोमेश क्षिरसागर, गणेश भालेराव, किशोर पवार  आदी मान्यवर उपस्थीत होते.

ढोलताशांचा गजर, लेझीम, आदी पारंपारीक वाद्यासह फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टर वर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची जल्लोषात मिरवणुक काढण्यात आली. यासाठी उत्सव समितीचे मिरवणुक प्रमुख उमेश कांबळे, संदीप जाधव, विकास डोळपे, दिनेश माने, फकीरा जाधव, अश्वमेध ड्रायव्हींग स्कुलचे चेअरमन बाळासाहेब जाधव, युवराज सकट, जिंतेद्र अष्टुळ, परमेश्वर खंदारे, मुकुंद अष्टुळ, अभिमान खंदारे, नागेश खंदारे, सागर अष्टुळ, दादाराव पाटोळे, आदीसह मंडळाच्या कार्यकर्त्यानी ही भव्य मिरवणुक शांततेत व उत्साहात पार पडण्यासाठी परिश्रम घेतले.

रविवार हा आठवडयाचा बाजाराचा दिवस असुनही ही जयंती उत्सवाची मिरवणुक शांततेने व उत्साहाने पार पाडण्यासाठी मोहोळ पोलीस स्टेशनचे नुतन पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता . 

Web Title: Lokshahir Annabhau sathe birth anniversary celebration