अखेर लालचंद आजोबा पोचले घरी! 

परशुराम कोकणे
शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019

सोलापूर : पाच दिवसांपासून घरापासून दूर असलेल्या 70 वर्षीय लालचंद पवार आजोबांच्या कुटुंबीयांची गुरुवारी भेट झाली. स्मरणशक्ती कमी झाल्याने लालचंद आजोबा अक्कलकोट रस्ता परिसरातील घरापासून चुकून साखरपेठ परिसरात आले होते. त्यांच्या कुटुंबीयाची भेट घालून देण्यात सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. 

सोलापूर : पाच दिवसांपासून घरापासून दूर असलेल्या 70 वर्षीय लालचंद पवार आजोबांच्या कुटुंबीयांची गुरुवारी भेट झाली. स्मरणशक्ती कमी झाल्याने लालचंद आजोबा अक्कलकोट रस्ता परिसरातील घरापासून चुकून साखरपेठ परिसरात आले होते. त्यांच्या कुटुंबीयाची भेट घालून देण्यात सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. 

पाच दिवसांपूर्वी लालचंद पवार हे घराशेजारी राहणाऱ्या कुंभार यांच्याकडे गेले होते. परत येताना ते घरचा रस्ता विसरले. रस्ता चुकल्याने ते साखर पेठ परिसरात पोचले. अंधार झाला तरी लालचंद आजोबा घरी न आल्याने मुलगा, मुलगी, सून, नातवंडे आणि शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी शोध घेतला. लालचंद आजोबांसाठी सर्वजण व्याकुळ झाले होते. बेपत्ता झालेल्या लालचंद आजोबांच्या मदतीला अखिल भारत नागरिक ग्राहक महासंघाचे सदस्य धावून आले. त्यांनी साखर पेठ पोलिस ठाण्यातील पोलिसांना याबाबतची माहिती दिली. हरवलेल्या लालचंद आजोबांची बातमी 6 फेब्रुवारीला "सकाळ'मध्ये प्रसिद्ध करण्यात आली. 

आजोबांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सामाजिक कार्यकर्त्यांनी बुलढाणा येथील मलकापूर पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. आजोबांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. योगायोगाने मलकापूर पोलिस ठाणे येथे लालचंद पवार यांच्या भावाच्या मित्राशी संपर्क झाला. त्यांच्याकडून लालचंद आजोबांची मुलगी मेघा व मुलगा दिनेश यांचा मोबाईल क्रमांक मिळाला. त्यांना संपर्क साधल्यानंतर अक्कलकोट रोड परिसरातील मल्लिकार्जुननगर शेजारच्या नितीन नगरात आजोबांचे घर असल्याचे समजले. त्यानंतर कुटुंबीयांना शासकीय रुग्णालयात बोलावून घेऊन आजोबांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले. 

मी मुंबईला होतो.. 
गेल्या महिनाभरापासून आजोबाची स्मरणशक्ती कमी झाली आहे. त्यांना लहानपणीचे सर्व आठवते. मलकापूरचे घर आठवते मात्र काल काय घडले ते आठवत नाही. अखिल भारत नागरिक ग्राहक महासंघाचे अध्यक्ष रवींद्र जोगीपेठकर, सचिव मधुकर मडूर यांनी घरी जाऊन आजोबांची भेट घेतली. स्मरणशक्ती कमी झाल्याने मी मुंबईला होतो, असे आजोबा सांगत आहेत. पाच दिवसांनंतर आजोबा पुन्हा मिळाल्याने त्यांच्या घरी व परिसरात आनंदाचे वातावरण आहे. या घटनेची "सकाळ'ने दखल घेतली. पोलिसांनी मदत केल्याने आजोबांना आपले घरी मिळाल्याची भावना जोगीपेठकर यांनी बोलून दाखविली.

सत्तर वर्षांच्या लालचंद आजोबांना जायचयं घरी!​

Web Title: lost old man reached his home safely at solapur