भरतीवेळी सापडलेले पॉकेट पोलिसाने केले परत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

सोलापूर : ग्रामीण पोलीस मुख्यालयात सुरु असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान एका उमेदवारांचे सापडलेले पाच हजारांची रोकड, आधार कार्ड असलेले पॉकेट पोलिस नाईक सचिन माने यांनी प्रामाणिकपणे परत केले. 

सोलापूर : ग्रामीण पोलीस मुख्यालयात सुरु असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान एका उमेदवारांचे सापडलेले पाच हजारांची रोकड, आधार कार्ड असलेले पॉकेट पोलिस नाईक सचिन माने यांनी प्रामाणिकपणे परत केले. 

सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रियेची धावपळ सुरु होती. घाईगडबडीत उमेदवार तानाजी हणुमंत शिनगारे (रा.पंढरपूर) यांच्या खिशातील पॉकेट हरविले. कर्तव्यावर असलेल्या पोलिस नाईक सचिन माने यांना ते पॉकेट सापडले. त्यामध्ये पाच हजारांची रोकड, एटीएम कार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड व आधार कार्ड होते. पोलिस नाईक सचिन माने यांनी प्रामाणिकपणे शिनगारे यांना पॉकेट परत केले. आपले पॉकेट परत मिळाल्याचा आनंद तानाजी यांच्या चेहऱ्यावर सहज दिसत होता. पॉकेट परत दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्या हस्ते पोलीस नाईक सचिन माने यांचा सत्कार केला.

Web Title: lost pocket returned by policemen