हरोलीतील प्रेमी युगुलाची आग्य्राजवळ आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016

सांगली - हरोली (ता. कवठेमहांकाळ) येथून सहा दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन प्रेमी युगुलाने आग्रा (उत्तर प्रदेश) शहराजवळील शाहदरा येथे रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. बुधवारी (ता. 28) रात्री आठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. अयोध्या ऊर्फ सोनाली दिनकर पाटील (वय 15) आणि झाकीर दिलावर मुजावर (17) अशी त्यांची नावे आहेत. 

सांगली - हरोली (ता. कवठेमहांकाळ) येथून सहा दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन प्रेमी युगुलाने आग्रा (उत्तर प्रदेश) शहराजवळील शाहदरा येथे रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. बुधवारी (ता. 28) रात्री आठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. अयोध्या ऊर्फ सोनाली दिनकर पाटील (वय 15) आणि झाकीर दिलावर मुजावर (17) अशी त्यांची नावे आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी - अयोध्या दहावीत शिकते. झाकीर बारावीत आहे. दोघांचे काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. 23 सप्टेंबरला शाळेला गेलेली अयोध्या रात्री उसिरापर्यंत परतली नाही. तिचा सर्वत्र शोध घेऊनही ती सापडली नाही. त्यामुळे नातेवाइकांनी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात तिच्या अपहरणाची फिर्याद नोंदवली. तिचा ठावठिकाणा शोधताना ती झाकीरबरोबर पळून गेल्याची माहिती पुढे आली. दोघांचे नातेवाईक चार-पाच दिवस त्यांचा शोध घेत होते. 

शाहदरा येथे रेल्वेखाली उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याची घटना काल रात्री उघडकीस आली. तेथील स्थानिक नागरिकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर शाहदरा पोलिस ठाण्यास कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांची बॅग तपासल्यानंतर आग्रा येथे ताजमहलसमोर घेतलेले दोघांचे छायाचित्र मिळाले. काही मोबाइल क्रमांक मिळाले. त्यावरून नातेवाइकांशी संपर्क साधला. चौकशीत अयोध्या आणि झाकीर यांची नावे निष्पन्न झाली. बेपत्ता अयोध्या व झाकीर यांनी आत्महत्या केल्याचे समजताच नातेवाइकांना धक्काच बसला. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी तेथे बंदोबस्त तैनात केला आहे. 

दरम्यान, शाहदरा पोलिस ठाण्यात प्रेमी युगुलाच्या आत्महत्येची नोंद झाली आहे. पोलिसांनी दोघांच्या नातेवाइकांना कळवल्यानंतर ते मृतदेह ताब्यात घेण्यासाठी तिकडे रवाना झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत मृतदेह गावात आणले नव्हते. शुक्रवारी मृतदेह आणले जातील अशी शक्‍यता आहे. 

ताजमहाल पाहून आत्महत्या 
आग्र्याजवळ अयोध्या व झाकीर यांनी आत्महत्येपूर्वी ताजमहलला भेट दिली. तेथे ताजमहालसमोर छायाचित्र काढून घेतले. त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली. दोघांच्या बॅगेत छायाचित्र मिळाले आहे. तेथील स्थानिक दैनिकांनी दोघांच्या छायाचित्रासह आत्महत्येचे ठळक वृत्त प्रसिद्ध केले आहे.

Web Title: lover committed suicide near agra