तासगाव तालुक्यात प्रेमीयुगुलाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

तासगाव - प्रेमसंबंधाला असलेल्या घरच्यांच्या विरोधातून प्रेमीयुगुलाने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना बोरगाव (ता. तासगाव) येथे घडली. काल (ता. २४) रात्री अकराला हा प्रकार उघडकीस आला. गणेश बाळासो पाटील (वय ३४) आणि सारिका संभाजी पाटील (वय २०, दोघेही रा. बोरगाव) अशी त्यांची नावे आहेत. तासगाव पोलिसांत आत्महत्येची नोंद झाली आहे. 

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, बोरगाव येथील गणेश पाटील आणि सारिका पाटील हे शेजारीच राहतात. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, भावकीतीलच असल्याने दोघांच्या घरच्यांचा त्याला विरोध होता. तीन महिन्यांपूर्वी दोघे घरातून पळून गेले होते. त्यानंतर दीड महिन्यापूर्वी दोघेही परत आले. पळून जाऊन परत आल्यानंतर त्यांची समजूत काढण्यात आली. काल रात्री नऊच्या सुमारास गणेश गावात आला. त्याने आपण आल्याचे कोणालाच सांगितले नव्हते. 

गाव झाले सुन्न...
गणेश कोल्हापूर येथे एका कारखान्यात कामास होता. सारिकाचे शिक्षण पदवीपर्यंत झाले आहे. ती घरीच असायची. काल रात्री गणेश बोरगाव येथे आला. हे त्याचा मृतदेह पाहीपर्यंत त्यांच्या घरच्यांनाही माहिती नव्हते. या घटनेमुळे गाव सुन्न झाले आहे.

त्याचवेळी सारिकादेखील घरातून बाहेर पडली. सारिका अचानक घरातून बाहेर पडल्याने घरच्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, रात्री साडेदहाच्या सुमारास एका द्राक्षबागेत सारिका व गणेश या दोघांचे मृतदेह आढळले. दोघांनी विष पिऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. हा प्रकार निदर्शनास येताच तासगाव पोलिसांना माहिती देण्यात आली. रात्री उशिरा उत्तरीय तपासणीनंतर दोघांचेही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. तासगाव पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Lovers couple suicide incidence in Tasgaon Taluka