सज्जनगडावरून उडी मारून  प्रेमीयुगुलाची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

सातारा - सज्जनगडावर फिरण्यासाठी आलेल्या प्रेमीयुगुलाने दरीत उडी मारून आज आत्महत्या केली. 

पूनम अभय मोरे (वय 26) व नीलेश अंकुश मोरे (वय 30, दोघेही मूळ रा. पाटण, सध्या रा. मुंबई) अशी त्यांची नावे आहेत. 

सातारा - सज्जनगडावर फिरण्यासाठी आलेल्या प्रेमीयुगुलाने दरीत उडी मारून आज आत्महत्या केली. 

पूनम अभय मोरे (वय 26) व नीलेश अंकुश मोरे (वय 30, दोघेही मूळ रा. पाटण, सध्या रा. मुंबई) अशी त्यांची नावे आहेत. 

पूनमचा विवाह झाला होता. सध्या त्या पतीसह मुंबईत राहत होत्या. दोन ते तीन दिवसांपासून मुंबईतील घरातून त्या मुलासह बाहेर गेल्या होत्या. घरी न आल्याने त्यांच्या पतीने मुंबई येथे त्या बेपत्ता झाल्याबाबतची तक्रार नोंदवलेली आहे. नीलेश हा त्यांच्याच गावातील असून तोही सध्या मुंबईलाच राहात होता. या दोघांचे प्रेमसंबंध होते, अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. दोघे आज सज्जनगडावर फिरण्यासाठी आले होते. त्या वेळी त्यांनी गडावरून दरीत उडी मारून आत्महत्या केली. याबाबतची माहिती मिळाल्यावर सातारा तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव व कर्मचारी तातडीने घटनास्थळी गेले. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यासाठी महाबळेश्‍वर येथील सह्याद्री ट्रेकर्सच्या पथकाला बोलावण्यात आले होते. त्यांच्या मदतीने मृतदेह वर काढण्याचे काम सुरू होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर दोघांचेही नातेवाईक घटनास्थळी आले होते. 

पूनम यांचा मुलगा गडावरच 
पूनम यांना चार वर्षांचा देवराज नावाचा मुलगा आहे. त्या मुलालाही त्या सोबत घेऊन गडावर गेल्या होत्या. मुलाला सज्जनगडावरच ठेवून त्यांनी दरीत उडी टाकली. या घटनेची पुसटशीही कल्पना नसलेला देवराज गडावरच बसून होता. त्याला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Web Title: Lover's suicide by jumping on sajjangad