सिलिंडरच्या दरवाढीमुळे सामान्यांचे मोडले कंबरडे 

सरदार करले - सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - अर्थसंकल्प सादर झाला त्याच दिवसापासून गॅस सिलिंडरच्या दरात 71 रुपयांची वाढ झाली. या वर्षातील ही पहिली मोठी दरवाढ आहे. गॅस सिलिंडरसाठी नियमाने 695 रुपये मोजावे लागणार असले तरी गॅस घरपोच केल्याबद्दल डिलिव्हरी बॉय दहा रुपये घेतात. त्यामुळे प्रत्यक्षात 705 रुपये मोजावे लागत आहेत.

गॅस आणि पेट्रोलच्या किमती काही महिन्यांत वाढल्याने सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले आहे. 

गॅस सिलिंडरचे दर आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणे निश्‍चित केले जातात. केंद्र सरकारने सिलिंडरसाठी थेट अनुदान देण्याऐवजी अनुदानाची रक्कम थेट ग्राहकांच्या नावे जमा करण्याची पद्धत सुरू केली. गॅस सिलिंडर वापरातील काळाबाजार रोखण्यासाठी हा प्रयोग केल्याचे सांगण्यात येते. अनुदानित आणि विनाअनुदानित अशा दोन पद्धतीने गॅस सिलिंडर दिले जाते. मूळ सिलिंडरची किंमत 490 ते 500 च्या आसपास आहे. त्यावरील रक्कम अनुदान स्वरूपात गॅस ग्राहकाच्या बॅंक खात्यात जमा केली जाते. वर्षाला 12 सिलिंडरसाठी अनुदान दिले जाते. त्यापेक्षा अधिक संख्या झाल्यास विनाअनुदानित दराने सिलिंडर घ्यावे लागते. गेल्या वर्षात आठ ते नऊ वेळा गॅसच्या किमती कमी झाल्या आणि चार वेळा वाढल्या. वाढताना मोठ्या प्रमाणावर वाढ होते आणि कमी होताना ती कमी रकमेने होते. 

नव्याने दरवाढ झाल्यानंतर गॅस सिलिंडरचा दर 695 रुपये झाला आहे. त्यावर 195 रुपये अनुदान जमा होईल, असे सांगितले जात आहे. झालेली दरवाढ ग्राहकांच्या लक्षातही आलेली नाही. त्यामुळे त्याविरोधात आवाज उठवण्याची गरजही कुणाला वाटत नाही. 

जिल्ह्यात भारत गॅस, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल या कंपन्यांसह अन्य काही खासगी कंपन्यांतर्फे गॅस वितरित केला जातो. या सर्व कंपन्यांची जिल्ह्यातील ग्राहकांची संख्या सुमारे सहा लाख आहे. थंडीच्या काळात गॅसचे दर वाढतात आणि उन्हाळ्यात कमी होतात, असेही सांगण्यात आले. 

दरवाढीची लोकांना सवयच 
पेट्रोलचे दर गेल्या वर्षात अनेक वेळा वाढले. काही वेळा कमी झाले; पण वाढ होताना अधिक रुपयांची होती. 65 रुपयांचे पेट्रोल आज 77 रुपयांपर्यंत गेले आहे. दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले आहे. अधिक रकमेने वाढ होते आणि कमी रकमेने कपात होते. असे का, याचे कोडे मात्र सर्वसामान्यांना उलगडत नाही. होणारी दरवाढ सहन केली जाते.

Web Title: LPG prices increase