Lumpy skin disease : लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव वाढला

दिवसात ११० जनावरे बाधित : दहा जनावरांचा मृत्यू
Lumpy-Skin-Disease
Lumpy-Skin-Diseaseesakal

सांगली : जिल्ह्यात लम्पी त्वचा रोगाचा फैलाव वाढत असून संसर्गाचा विळखा पसरत आहे. आज एका दिवसात विक्रमी ११० जनावरांना लम्पीची बाधा झाली. १० जनावरांचा मृत्यू झाला.

लम्पी त्वचा रोगाने बाधित होणाऱ्या पशुधनाचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असून आज अखेर बाधित झालेल्या जनावरांची संख्या दीड हजारांच्या घरात गेली आहे. बाधित ९१९ जनावरांवर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. दोन महिन्यापासून लम्पी स्कीनचा संसर्ग सुरु आहे. प्रतिबंधासाठी प्रशासन उपाययोजना करत आहे, तरीही साथ आटोक्यात येत नसल्याचे दिसत आहे.

आज नव्याने विक्रमी ११० जनावरांना बाधा झाल्याचे आढळून आले. आतापर्यंत जिल्ह्यात एक हजार ४४९ जनावरांना लम्पीचा संसर्ग झाला असून आतापर्यंत ९२ जनावरांचा मृत्यू झाला आहे, तर ४४९ जनावरे आजारातून बरी झाली आहेत.

लम्पी त्वचा रोगाला अटकाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून गाय व बैलांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्यात तीन लाख ३७ हजार ४४१ जनावरांचे लसीकरण झाले आहे. खासगी दूध संघाकडूनही जनावरांचे लसीकरण करण्यात आले.

जिल्हा प्रशासनाकडे तीन लाख तीन हजार शंभर लसीचे डोस प्राप्त झाले होते. परंतु साथ आटोक्यात येत नसल्याने शेतकऱ्यांची काळजी वाढली आहे. लसीकरणानंतर समारे २८ दिवसांनंतर परिणाम दिसून येतो. सध्या ‘लम्पी’बाधित जनावरांची संख्या वाढत चालल्याने लसीकरणाचा प्रभाव झाला की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. आतापर्यंत बाधित जनावरे अशी : मिरज ४४३, आटपाडी ९५, पलूस २००, वाळवा ३२२, खानापूर ९३, तासगाव ९१, कडेगाव ३६, कवठेमहांकाळ ८८, जत ७५, शिराळा २२.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com