esakal | काँग्रेसच्या उमेदवारासाठी मतदारांना पैशाचं आमिष; बेळगावात तिघांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेडमधील घरफोडीप्रकरणी तिघांना अटक

काँग्रेसच्या उमेदवारासाठी मतदारांना पैशाचं आमिष; बेळगावात तिघांना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक २१ मधील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सरला उमेश सातपुते (रा.जुने बेळगाव) यांच्यासाठी उमेदवारांना आमिष दाखवत पैशाचे वाटप करणाऱ्या तिघांना शहापूर पोलिसांनी गुरुवार (ता. २) अटक केली आहे. त्यांच्याकडून ३१ हजार ७०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून त्यांच्या विरोधात कृषी खात्याचे संचालक मंजू नारायण कित्तूर (वय ३९) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

शहापूर पोलिसांनी संतोष पुंडलिक सातपुते (वय ४०, रा. उपार गल्ली खासबाग), सचिन सोमनाथ हुलीकोलत उर्फ जाधव (वय २७, रा. पाटील गल्ली कणबर्गी) आणि अनिल गणपती सोंटक्की (वय १८, रा. रेणुकादेवीनगर जुनेबेळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीताची नावे आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक २१ मधून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून सरला सातपुते निवडणूक लढवत आहेत. महापालिकेसाठी उद्या मतदान होणार असल्याने मतदारांना आमिष दाखवत पैशांचे वाटप केले जात आहे.

हेही वाचा: मालकाचे पैसे बुडविण्यासाठी पोटच्या गोळ्याचा खून

अशी माहिती निवडणूक अधिकारी मंजू कित्तूर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी वरील तिघा संशयितांना सार्वजनिक रस्त्यावर थांबून पैसे वाटप करत असताना रंगेहात शहापूर पोलिसांच्या मदतीने अटक केली. त्यावेळी त्यांच्याकडून ३१ हजार ७०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. वरील तिघा संशयिताविरोधात शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून याप्रकरणी पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर पुढील तपास करीत आहेत.

loading image
go to top