मदन पाटील यांचा 8 वर्षांनंतर बाजार समितीत फोटो लागणार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

सांगली - सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल आठ वर्षांच्या खंडानंतर दिवंगत माजी मंत्री मदन पाटील यांचा फोटो लागणार आहे. आठ वर्षांपूर्वी जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेलची सत्ता आल्यानंतर त्यांचा फोटो काढण्यात आला होता. आता भाऊ गट सत्तेत सहभागी झाल्याने सभापती कक्षात मदनभाऊंचा मोठा फोटो लावण्याचा निर्णय सभापती प्रशांत शेजाळ यांनी घेतला आहे. 

मधल्या काळात बाजार समितीच्या विस्तारात, निर्णयांत मदन पाटील यांचा शब्द अंतिम होता. बेदाणा व्यापार विकासापासून विष्णुअण्णा फळ मार्केटच्या विस्तारापर्यंत त्यांनी मोठे निर्णय घेतले. त्यामुळे ते हयात असताना त्यांचा मोठा फोटो सभापती कक्षात असायचा. परिवर्तन पॅनेलची सत्ता आल्यानंतर तत्कालीन सभापती भारत डुबुले यांनी फोटो पॉलिसी बदलून टाकली. एकीकडे राजारामबापू पाटील यांची प्रतिमा वसंतदादांच्या प्रतिमेसोबत समितीच्या लोगोमध्ये आली, तर दुसरीकडे मदनभाऊंचा फोटो काढून ठेवण्यात आला. पुढे सत्तेच्या चार वर्षांत हेच चित्र राहिले. संचालक मंडळ बरखास्त होऊन प्रशासक आल्यानंतर सर्व नेत्यांचे फोटो भिंतीवरून खाली आले. 

गेल्या निवडणुकीत मदन पाटील विजयी झाले, मात्र त्यांची सत्ता गेली. वसंतदादा, कदम गट, घोरपडे समर्थकांनी सत्ता मिळवली. त्यानंतर भाऊंचे निधन झाले. या काळात त्यांच्या फोटोला समितीच्या भिंतीवर स्थान मिळालेच नाही. आता भाऊ गटाने कदम गटाशी जुळवून घेत सभापती निवडीत महत्त्वाची भूमिका पार पाडली. वसंतदादा गट व घोरपडे समर्थकांना बाजूला ठेवले. परिणामी, भाऊंच्या फोटोला आठ वर्षांनंतर भाऊंचा फोटो सभापती कक्षात दिसणार आहे. सध्या कक्षाची डागडुजी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर फोटो लावला जाणार असल्याचे श्री. शेजाळ यांनी सांगितले.

Web Title: Madan Patil Photo in bazar samiti