माढ्यात पाच संजयने गाजवले राजकीय रणांगण

किरण चव्हाण 
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्‍यात पाच संजय नावाच्या व्यक्तींनी माढा व करमाळा विधानसभा निवडणुकीत राजकीय रणांगणावर ठसा उमटवला आहे.

माढा (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्‍यात पाच संजय नावाच्या व्यक्तींनी माढा व करमाळा विधानसभा निवडणुकीत राजकीय रणांगणावर ठसा उमटवला आहे. करमाळ्याचे आमदार संजय शिंदे, माढा विधानसभेचे शिवसेना भाजपचे उमेदवार व भाजप तालुकाध्यक्ष संजय कोकाटे, बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील घाटणेकर, जिल्हा परिषदेतील माजी सभापती संजय पाटील भीमानगरकर, भाजपचे कुर्डुवाडी शहराध्यक्ष संजय टोणपे हे पाच संजय माढा व करमाळा या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील व दोन्ही तालुक्‍यातील राजकारणात सक्रीय असतात. 

कधी या सर्वांचे पक्ष गट- तट वेगवेगळे असतात तर कधी एकाचे पक्षाचे अथवा राजकीय गटाचे काम करतात. कधी हे एकमेकांविरुद्ध उभे ठाकून एकमेकांना पराभवाची धूळ चारतात तर कधी एकमेकांना विजयी करण्यासाठी जीवाचे रानही करतात. करमाळा व माढा विधानसभा व तालुक्‍यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तर कधी जन आंदोलने उभा करून हे पाचही संजय या दोन्ही तालुक्‍याच्या राजकीय कुरूक्षेत्रावर मागील अनेक वर्षापासून सक्रीयपणे वावरताना दिसतात.

सध्या करमाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार संजय शिंदे हे विजयी झाल्याने पाचपैकी एका संजयला आमदार होण्याच्या संधी मिळाली आहे. आमदार शिंदेंना त्यांचे पूर्वश्नमीचे कट्टर विरोधक व मोहिते-पाटील यांचे पूर्वश्नमीचे कट्टर समर्थक असलेल्या संजय पाटील - घाटणेकर यांची माढा लोकसभा व करमाळा विधानसभा निवडणुकीत मोठी मदत झाली आहे. 

माढा विधानसभा निवडणुकीत मोहिते-पाटील यांचे समर्थक माळेगावचे संजय कोकाटे यांनी शिवसेनेकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात दंड थोपटले पण त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र त्यांनीही नवखे असताना चांगली झुंज दिली. पराभवानंतरही ते माढा विधानसभा मतदारसंघात सक्रीयपणे राजकारणात राहणार आहेत. 

भीमानगरचे जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय पाटील - भीमानगरकर हे आ. बबनराव शिंदे यांचे कट्टर विरोधक व मोहिते-पाटील यांचे समर्थक होते. परंतु या विधानसभा निवडणुकीत संजय पाटील - भीमानगरकर यांनी आ. बबनराव शिंदे यांचे जोरदार समर्थन करत प्रचार करत आ. शिंदेंना विजयश्री मिळवण्यात मोलाचा वाटा उचलला. 

कुर्डुवाडी शहराचे भारतीय जनता पक्षाचे व शहराध्यक्ष असलेले संजय टोणपे यांनीही मराठा क्रांतीरमाळा विधानसभा मतदारसंघातही ते सक्रीय असतात. मोर्चाचे समन्वयक म्हणून तालुक्‍यात मोठे काम केले आहे. क यंदाही त्यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघात सक्रीयपणे काम केले आहे. 

माढा तालुक्‍यातील संजय मोहिते - पाटीलांपासून दूरावले 
माढा तालुक्‍यातील संजय पाटील - भीमानगरकर, संजय पाटील घाटणेकर हे मोहिते-पाटील यांचे समर्थक मोहिते-पाटील - पाटील यांच्यापासून दूरावत शिंदे बंधूंच्या प्रचारात सक्रीय झाले. आ. संजय शिंदे यांनी तर फार वर्षांपूर्वीच मोहिते-पाटील यांच्यापासून फारकत घेत त्यांना तीव्र विरोध केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Madha Politics Vidhan Sabha 2019