मधुरांगणच्या स्नेहसंमेलनात मैत्रिणींचा जल्लोष

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

मिरज - मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मधुरांगणने आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनाने जल्लोष उडवून दिला. हरहुन्नरी कलाकार आणि मधुरांगणच्या मैत्रिणींनी एकापेक्षा एक आयटम सादर करत कार्यक्रमात जान आणली. 

मिरज - मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मधुरांगणने आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनाने जल्लोष उडवून दिला. हरहुन्नरी कलाकार आणि मधुरांगणच्या मैत्रिणींनी एकापेक्षा एक आयटम सादर करत कार्यक्रमात जान आणली. 

बालगंधर्व नाट्यगृहात आयोजित स्नेहसंमेलनाचे प्रायोजकत्व ट्राय कलर होंडा होते. ट्राय कलरचे अमित मगदूम यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. गेले वर्षभर मैत्रिणींना अनेक सरस कार्यक्रम देणाऱ्या मधुरांगणने या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने वर्षाची सांगता केली. एरवी प्रेक्षागृहात बसून कार्यक्रमांचा आनंद घेणाऱ्या मैत्रिणींना आज स्वतःची कलाकारी सादर करण्याची संधी मिळाली होती; त्याचा पुरेपूर फायदा त्यांनी उचलला. घराच्या चार भिंतींआड लपून राहिलेली कला रंगमंचावर सादर केली. नृत्य, नकला, गायन, फॅशन शो यांच्या माध्यमातून त्या व्यक्त झाल्या. 

कथ्थक नृत्यांगणा अमिषा करंबळेकर यांच्या शिष्यांनी कथ्थक सादर केले. स्कॉलर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी समूहनृत्य आणि फॅशन शो सादर केला. रायझिंग स्टारने स्केटिंग डान्स केला. सेजल शहा, पूजा सन्नके, रेवती फडके, साधना माळी ग्रुपच्या श्रीया माळी, साक्षी माणकापुरे, हेमा कांबळे, शिवानी फंड, अश्‍विनी उदगावे, वर्षा जाधव, मीनाक्षी फडके, प्रिया पंडित, अनिता, माधुरी फडके, क्रिशा माळी यांच्या सोलो नृत्यांनी रंगमंचावर धूम केली. मिरज हायस्कूलने लोकनृत्य सादर करून टाळ्या वसूल केल्या. देवयानी साठे हिने गिटारवादन केले. सुमन दुर्गाडे यांनी गवळण सादर केली. पूनम पवार, देवांग जोशी, धनंजय जोशी व दीपश्री लाड यांच्या एकपात्री नाटिकांनी दाद मिळवली. 

महिलांनी शिट्या वाजवून लावण्यांना प्रतिसाद दिला. त्यांच्या कुटुंबीयांनाही कलाकारी सादर करण्याची संधी मिळाली. दररोजच्या रहाटगाडग्यातून उसंत घेऊन मनसोक्त आनंद मिळवण्याची संधी स्नेहसंमेलनाने दिली. वैशाली गोडबोले यांनी सूत्रसंचालन केले. 

मधुरांगणसाठी ट्राय कलर होंडाच्या ऑफर्स 
ट्राय कलर होंडाचे प्रमोद माने यांनी मधुरांगण सभासदांसाठी ट्राय कलर होंडातर्फे अनेक सवलती व योजना जाहीर केल्या. स्कुटर स्पॉट बुकिंगवर एक हजारांची सवलत, दुचाकीवर दीड हजार रुपये सवलत, पहिले सर्व्हिसिंग व जनरल चेकअप मोफत अशा योजना जाहीर केल्या. महिलांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. 

Web Title: Madhurangana gathering

टॅग्स