महाबळेश्‍वरमध्ये हिमकण; थंडीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 डिसेंबर 2016

सातारा/महाबळेश्‍वर - जिल्ह्यात सर्वत्र गेल्या दोन दिवसांपासून थंडीच्या तीव्रतेत वाढ झाली आहे. आज या हंगामातील सर्वात कमी 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद सातारा शहरात झाली. तापमानाचा कमाल पारा 31 अंश सेल्सिअसवर होता. महाबळेश्‍वर येथेही थंडीचा जोर वाढला असून, तेथेही पारा 12 अंशाच्या खाली गेल्याची नोंद झाली आहे. वेण्णा लेक परिसरात आज हिमकण जमा झाल्याचे पाहावयास मिळाले. नौकाविहारासाठी बोटीमध्ये चढ-उतार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जेटीवर ठिकठिकाणी हिमकण साचल्याचे दिसत होते. असेच चित्र या परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या गाड्यांच्या टपांवर, तसेच झोपड्यांच्या छपरांवर पाहावयास मिळाले.

सातारा/महाबळेश्‍वर - जिल्ह्यात सर्वत्र गेल्या दोन दिवसांपासून थंडीच्या तीव्रतेत वाढ झाली आहे. आज या हंगामातील सर्वात कमी 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद सातारा शहरात झाली. तापमानाचा कमाल पारा 31 अंश सेल्सिअसवर होता. महाबळेश्‍वर येथेही थंडीचा जोर वाढला असून, तेथेही पारा 12 अंशाच्या खाली गेल्याची नोंद झाली आहे. वेण्णा लेक परिसरात आज हिमकण जमा झाल्याचे पाहावयास मिळाले. नौकाविहारासाठी बोटीमध्ये चढ-उतार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जेटीवर ठिकठिकाणी हिमकण साचल्याचे दिसत होते. असेच चित्र या परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या गाड्यांच्या टपांवर, तसेच झोपड्यांच्या छपरांवर पाहावयास मिळाले. या वर्षी हिमकण दिसण्याची ही पहिलीच वेळ असल्याने त्याबद्दल पर्यटकांत विशेष कुतूहल होते.

Web Title: Mahabaleshwar snowflake; winter promotion

टॅग्स