
Sangli Politics : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत येलूर जिल्हा परिषद गटातील गावे वाळवा व शिराळा अशा दोन विधानसभा मतदारसंघांत विभागली आहेत. त्यानुसार येथे दोन तालुक्यांतील नेत्यांचा प्रभाव राहिला आहे. तीस वर्षांपासून महाडिक गटाचे येथे वर्चस्व आहे. मागील निवडणुकीतील रचनेत हा मतदारसंघ ऐतवडे खुर्द ते शिगाव असा ‘वारणा’काठी विस्तारला आहे. महायुती विरुद्ध महाआघाडी अशीच पारंपरिक लढत राहील. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमुळे महायुती आणखी भक्कम होण्यास मदत होईल, असे आजचे चित्र आहे.