मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे म. ए. समितीच्यावतीने 13 डिसेंबराला आयोजन

कर्नाटक सरकारच्या बेळगावातील अधिवेशनाचा निषेध नोंदविण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने १३ डिसेंबराला मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन केले आहे.
Manohar Kinekar
Manohar KinekarSakal

बेळगाव - कर्नाटक सरकारच्या बेळगावातील अधिवेशनाचा निषेध नोंदविण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने १३ डिसेंबराला मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यामुळे विभागवार कमिटी स्थापन करून गावोगावी जनजागृती करत महामेळावा प्रचंड ताकदीनिशी यशस्वी करण्याचा निर्धार तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने व्यक्त करण्यात आला.

गोवावेस येथील मराठा मंदिरामध्ये महामेळाव्या संदर्भात चर्चा करण्यासाठी रविवारी (ता.५) तालुका समितीची बैठक झाली. कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. प्रथम समितीच्या दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सरचिटणीस एम. जी. पाटील यांनी बैठकीचा उद्देश सांगितला व महामेळावा यशस्वी करण्याचे आवाहन केले. त्यानंतर कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी प्रस्ताविक केले. श्री. किणेकर म्हणाले, सीमाभागातील संस्कृती ही मराठी आहे २००४ साली सीमा खटला सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला असून सर्व पुरावे न्यायालयात सादर केले आहेत. तरी देखील येथील मराठी माणसाला डिवचण्यासाठी जाणून-बुजून बेळगावात अधिवेशन भरविले जात आहे. त्यामुळे याला विरोध करीत निषेध नोंदविण्यासाठी १३ तारखेचा नियोजित महामेळावा यशस्वी करूया. सरकार व प्रशासन वेगवेगळ्या पद्धतीने अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. परवानगी मिळो अगर न मिळो गावोगावी सभा घेऊन जागृतीचे काम आजपासून हाती घेण्यात यावे. या मेळाव्याला महाराष्ट्रातील नेतेमंडळी उपस्थित जाणार आहेत. मराठी भाषिकांनी पुन्हा एकदा आपल्या जिद्दीच्या जोरावर महामेळावा यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल सातत्याने अवमानकारक लिखाण केले जात आहे. त्याचाही यावेळी त्यांनी समाचार घेतला.

Manohar Kinekar
निपाणीत 'नेसा' तर्फे मॅरेथॉन स्पर्धा; १६३० स्पर्धकांचा सहभाग

माजी महापौर शिवाजी सुंठकर म्हणाले, सीमाभागातील मराठी माणसाची महाराष्ट्रात जाण्याची इच्छा आजही कायम आहे. सीमाभागातील जनतेला वेगवेगळ्या पद्धतीने कर्नाटक सरकार डिवचण्याचा प्रयत्न करते. पण आता मराठा समाज एकत्रित आला आहे. यापुढे देखील अशीच एकी अभेद्य ठेवली पाहिजे. विकी च्या जोरावर कर्नाटक सरकारला मराठी भाषिकांची ताकद दाखवून देऊ. गावोगावी बैठका घेऊन बहुसंख्येने लोक उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न केले जातील.

कृष्णा हुंदरे म्हणाले, समितीचा कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी देण्यासाठी टोलवाटोलवी केली जाते. यावेळी देखील महा मेळाव्याला परवानगी मिळो अगर न मिळो कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने व्हॅक्सिन डेपो मैदानावर १३ तारखेला दुपारी बारा वाजता उपस्थित राहावे व मेळावा यशस्वी करावा.

सुनील अष्टेकर म्हणाले, महामेळावा जनजागृती मध्ये आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि देखील सभा बैठका घेऊन लोकांमध्ये जागृती केली पाहिजे असे मत व्यक्त केले.

सरस्वती पाटील म्हणाल्या, सीमा बांधव गेल्या अनेक वर्षापासून केंद्र व राज्य सरकारशी झगडत आहे. हा संघर्ष मराठी माणसाला नवा नाही. न्यायालयीन लढ्यासह रस्त्यावरची लढाई देखील जिवंत ठेवणे जरुरीचे आहे. सर्वांनी शांततेत मैदानावर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

मनोज पावशे म्हणाले, कर्नाटक सरकारच्या हुकुमशाही दडपशाही ला न सुधारता महामेळावा यशस्वी करावा. मराठी माणूस नेहमी संयमाने व शांततेत आंदोलन करत असताना देखील प्रशासनाकडून त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जातो १७ जानेवारी १९५६ च्या देखील लढ्याला पोलिसांनी गालबोट लावले आहे. त्यामुळे सर्वांनी सोशल मीडियाचा वापर करून जनजागृती करावी. याचबरोबर एस. एल. भागोजी पाटील, म्हात्रू झंगरूचे यांच्यासह इतरांनीही आपले विचार व्यक्त केले. सरचिटणीस एम. जी पाटील यांनी आभार मानले.

बैठकीतील ठराव

  • १३ डिसेंबरच्या बेळगावातील कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाचा निषेध महामेळावा यशस्वी करण्यासाठी विभागवार बैठका घेऊन जागृती करणे.

  • छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक लिखाण केल्याबद्दल निषेध.

  • व्हॅक्सिन डेपो मैदानावर १३ डिसेंबर रोजी १२ ते ४ पर्यंत होणारा महामेळावा यशस्वी करावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com