"महामेष' योजनेचा 200 मेंढपाळांना फायदा 

संतोष सिरसट
शुक्रवार, 6 जुलै 2018

सोलापूर  - राज्यात मेंढपाळ व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनाने मागील वर्षी "राजे यशवंतराव होळकर महामेष योजना' सुरू केली होती. या योजनेच्या एक वर्षाच्या कालावधीत 200 मेंढपाळांना सुमारे साडेचार कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. त्यामध्ये नगर जिल्ह्यातील सर्वाधिक 70 मेंढपाळांचा समावेश आहे. 

सोलापूर  - राज्यात मेंढपाळ व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनाने मागील वर्षी "राजे यशवंतराव होळकर महामेष योजना' सुरू केली होती. या योजनेच्या एक वर्षाच्या कालावधीत 200 मेंढपाळांना सुमारे साडेचार कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. त्यामध्ये नगर जिल्ह्यातील सर्वाधिक 70 मेंढपाळांचा समावेश आहे. 

राज्यातील धनगर समाजातील जवळपास एक लाख मेंढपाळाकडून मेंढी पालनाचा व्यवसाय केला जातो. त्यांच्या सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शासनाने दोन जून 2017 पासून पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या वतीने "महामेष' योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून 75 टक्के अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यात 20 मेंढ्या व एक मेंढा नर असा मेंढीगट राज्यातील स्थायी व स्थलांतरित स्वरूपाच्या एक हजार मेंढपाळांना देण्याचे ठरले होते. यासाठी मागविलेल्या ऑनलाइन अर्जाची जिल्हास्तरीय समितीने छाननी करून स्थायी व स्थलांतरित स्वरूपाच्या प्रत्येकी 500 याप्रमाणे एक हजार मेंढपाळांची निवड केली आहे. त्यासाठी सुरवातीला चार कोटी 44 लाख रुपयांचा निधी महामंडळाकडे प्राप्त झाला होता. त्यापैकी 70 टक्के निधीचे वाटप झाले आहे; तसेच 92 मेंढपाळांना अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित 218 व स्थायी स्वरूपाच्या 500 अशा 718 मेंढपाळांसाठी शासनाने महामंडळाला चार कोटींचा निधी दिला आहे. मात्र, एवढ्या या मेंढपाळांच्या अनुदानासाठी हा निधी अपुरा आहे. त्यामुळे वाढीव 16 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी महामंडळाने शासनाकडे केली आहे. 

मेंढ्याचे गट मंजूर झालेले काही जिल्हे 
पुणे - 59, सातारा - 51, नाशिक - 69, नगर - 70, धुळे - 40, सोलापूर - 36, बुलडाणा व कोल्हापूर - 20, औरंगाबाद - 17, बीड - 13 

Web Title: Mahamesh scheme benefited 200 shepherds