SGI20A12792.jpg
SGI20A12792.jpg

समर्थांचा महाप्रसाद रद्द:  भाजीपाला वाटप 

सांगली : कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उत्सव, उपक्रम, कार्यक्रम रद्द करावे लागत आहे. त्यातून इतर समाजोपयोगी उपक्रम केले जात आहेत. खणभागातील गजानन हुलवाने यांनी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाचा महाप्रसाद रद्द करुन त्याऐवजी 1500 गरजू कुटुंबांना तब्बल सहा हजार किलो भाजीपाला वाटप केला. 


धनगर गल्लीत गजानन हुलवाने आणि मित्र परिवारातर्फे दरवर्षी स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा करण्यात येतो. यादिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हा उपक्रम रद्द करावा लागला. परंतू हुलवाने यांनी गरजू 1500 कुटुंबांना प्रत्येकी चार किलो प्रमाणे भाजीपाला वाटप केला. यावेळी खणभाग, गोसावी गल्ली, धनगर गल्ली आदी भागातील कुटुंबांना त्याचा लाभ झाला. लॉकडाऊनमुळे सर्व सामान्यांना भाजीपाला महागड्या दराने घ्यावा लागत आहे. 


यावेळी गजानन हुलवाने यांच्यासमवेत सुरज चोपडे, सुहास हुलवाणे, सुशांत हजारे, रोहित दुधाळ, गणेश शिंदे, नागेश माळी, प्रसाद सरडगी, शुभम रूपनर, अरुण जाधव, सुशांत आरगे, सुशांत पुजारी, विक्रम हुलवाणे, तेजस पालखे, सुनील पालखे, विनायक चोपडे, सनि चोपडे आदी उपस्थित होते. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com