Maratha Kranti Morcha : तिसगाव येथे टायर जाळून आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

तिसगाव (नगर) : नगर जिल्ह्यातील तिसगाव येथे मराठा आरक्षण मागणीसाठी बसस्थानक चौकात राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून रस्तारोको आंदोलन करण्यात आले. संपूर्ण गावात कडकडीत बंद पाळण्यात आला.

तिसगाव (नगर) : नगर जिल्ह्यातील तिसगाव येथे मराठा आरक्षण मागणीसाठी बसस्थानक चौकात राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून रस्तारोको आंदोलन करण्यात आले. संपूर्ण गावात कडकडीत बंद पाळण्यात आला.

आजचा आठवडे बाजारही बंद ठेवण्यात आला. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट झाला आहे. त्यानंतर सकाळी अकरा वाजता बसस्थानक चौकात सकल मराठा समाजाच्या तरुणांनी एकत्र येऊन टायर जाळून रास्तारोको सुरु केला. मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणाने परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी तिसगावचे सरपंच काशिनाथ लवांडे, उपसरपंच इलियास शेख , नितीन लोमटे आदींनी आपल्या भाषणातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी केली.

सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा. अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या रस्तारोकोत मराठा समाज सर्व समाजाचे तरुण सहभागी झाले होते. यावेळी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: Maharashtra Bandh Maratha Kranti Morcha Nagar Tisgaon Tyre fire