
Sangli District Bank
esakal
तीन ठळक मुद्दे (Highlights):
सांगली जिल्हा बँकेच्या भरतीला स्थगिती: सांगली जिल्हा बँकेतील ५०७ जागांच्या भरतीस सहकार विभागाच्या अवर सचिव मंजुषा साळवी यांनी स्थगितीचे आदेश दिले असून, राज्यभरातील सहकारी संस्थांसाठी मार्गदर्शक धोरण तयार होणार आहे.
आमदार सदाभाऊ खोत यांचे गंभीर आरोप: खोत यांनी आरोप केला की, भरती प्रक्रियेत सत्ताधारी संचालक, अधिकारी आणि मंत्र्यांच्या वाटण्या ठरल्या होत्या, तसेच लाच आणि अनियमिततेच्या आधारे भरतीची योजना आखली होती.
फडणवीस यांचा हस्तक्षेप: आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रकरण मांडल्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी तातडीने भरतीला स्थगिती देऊन राज्यस्तरीय धोरण ठरवण्याचे आदेश दिले.
Sadabhau Khot Sangli District Bank : सांगली जिल्हा बँकेतील ५०७ जागांच्या नोकर भरतीस सहकार विभागाच्या अवर सचिव मंजुषा साळवी यांनी स्थगितीचे आदेश दिले आहेत. राज्यातील एकूणच सहकारी संस्थांमधील नोकर भरतीसाठी मार्गदर्शक धोरण ठरविले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचे आदेश दिल्याची माहिती आमदार सदाभाऊ खोत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.