

"हाळवणकरांना दिलेला शब्द पाळणार!" इचलकरंजीत भाजप समर्थकांच्या भेटीनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही; देवेंद्र फडणवीसांशी करणार चर्चा
Sakal
इचलकरंजी : मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असतांना माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना विधान परिषदेवर संधी देण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे मी दिलेला शब्द पाळणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.