esakal | रुग्णांची हेळसांड थांबवा, अन्यथा आंदोलन करु; महाराष्ट्र एकीकरण समितीचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

रुग्णांची हेळसांड थांबवा, अन्यथा आंदोलन करु; महाराष्ट्र एकीकरण समितीचा इशारा

रुग्णांची हेळसांड थांबवा, अन्यथा आंदोलन करु; महाराष्ट्र एकीकरण समितीचा इशारा

sakal_logo
By
मिलिंद देसाई

बेळगाव : जिल्हा रुग्णालयात होणारी कोरोना रुग्णांची हेळसांड थांबवा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे देण्यात आला आहे. मंगळवारी समितीच्या युवा कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना जाब विचारला. तसेच कोरोना रूग्णांसाठी बेड वाढवण्याची मागणी केली.

गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. तसेच इतर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात जाण्यास सांगितले जात आहे. याबाबत युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, मदन बामने, सागर पाटील, चंद्रकांत कोंडूसकर, ज्योतिबा पाटील, विनायक हुलजी आदींनी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना जाब विचारला. तसेच कोणत्याही रुग्णाला त्रास होणार नाही याची दखल घेण्यास सांगितले आहे. यावेळी जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती मिळली असल्याचे सांगितले. तरीही बेड कमी का? अशी विचारणा केली. यावेळी रुग्णालयात सध्या 180 बेड कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. तर 120 बेड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच आयसीयूमध्ये 10 व्हेंटिलेटर उपलब्ध असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

हेही वाचा: बेळगावात राणी चन्नमा विद्यापीठाचा सावळा गोंधळ; विद्यार्थ्यांत नाराजी

मागणी यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांकडून जिल्हा रुग्णालयात आलेल्या सर्व रुग्णांना दाखल करून घ्या, तसेच त्यांच्यावर आवश्यकतेनुसार उपचार करावेत. फक्त कोरोनाचे नव्हे तर इतर रुग्णांनाही आवश्यक ती सुविधा देण्यात यावी, ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करावेत अशी मागणी करण्यात आली. तसेच रुग्णांच्या नातेवाइकांकडून पुन्हा तक्रारी दाखल झाल्यास जाब विचारला जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी डॉक्टरांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची काळजी घेतली जात असून लवकरच सर्व अडचणी दूर केल्या जातील अशी माहिती दिली.

loading image