सांगली : ‘एचआयव्ही’ एड्सची भीती आता कमी झाली आहे. कारण त्यावर नियंत्रण ठेवण्यात यंत्रणांना यश आले आहे. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीमार्फत सुरू करण्यात आलेला ‘ईएमटीसीटी’ कार्यक्रम प्रभावी ठरला आहे. .या कार्यक्रमांतर्गत गत वर्षी १८३ बालके तपासण्यात आली. त्यापैकी १८१ बालके ‘एचआयव्ही’ आजारापासून मुक्त निदर्शनास आली. दोन बालकांना पुढील औषधोपचारासाठी ‘एआरटी’ विभागाशी संलग्नित करण्यात आले आहे. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. विवेक सावंत यांनी ही माहिती दिली..मुंबईत ‘एचआयव्ही’त घट.डॉ. सावंत म्हणाले, ‘‘जागतिक एड्सविरोधी दिन म्हणून १ डिसेंबर हा दिवस साजरा केला जातो. काही वर्षांपूर्वी एच.आय.व्ही. एड्स आजार भयंकर वाटायचा. पण आज ही परिस्थिती बदलली आहे. याचे सर्व श्रेय महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबईमार्फत चालविलेल्या विविध उपक्रमांना जाते. .त्यामध्ये माहिती, शिक्षण संवाद, समुपदेशन व चाचणी करण्याच्या अनुषंगाने ‘आयसीटीसी’ केंद्रांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. २००१ मध्ये ऐच्छिक तपासणी व मोफत सल्ला केंद्राची सुरुवात झाली. .HIV: एचआयव्ही बाधित महिलांनी दिला 259 निरोगी बालकांना जन्म.पूर्वी फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी असलेली ही केंद्रे आता तालुकास्तरापर्यंत आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे व खासगी रुग्णालयांच्या मदतीने गावोगावी सुरू झाली आहेत. एकाच छताखाली सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष, गर्भवती माता व बालकांची एच. आय. व्ही. तपासणी अगदी मोफत सुरू झाली. .‘आयसीटीसी’मध्ये येणाऱ्या सर्व लोकांना एच. आय. व्ही. एड्सबद्दल चाचणीपूर्व समुपदेशन केले जाते. यानंतर त्यांची संमती असेल तर एच. आय. व्ही. तपासणी केली जाते. चाचणीपूर्व समुपदेशनात एच.आय.व्ही.चा रिर्पोट स्वीकारण्याची त्या व्यक्तीची मानसिक तयारी करून मग त्यांची टेस्ट केली जाते.’’.ते म्हणाले, ‘‘एच.आय.व्ही.चा रिर्पोट पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह, प्रत्येक व्यक्तीला चाचणीपश्चात समुपदेशन केले जाते. व्यक्तीचा रिर्पोट निगेटिव्ह आला तर आपण आयुष्यभर निगेटिव्ह राहण्यासाठी अतिजोखमीचे वर्तन कमी करण्याबद्दल समुपदेशन केले जाते. व्यक्तीचा रिर्पोट पॉझिटिव्ह असला तर त्याला वैयक्तिक व कौटुंबिक समुपदेशन केले जाते..तसेच त्यांच्या मुलांचीही तपासणी केली जाते. पॉझिटिव्ह व्यक्तीला रिर्पोट देऊन येथेच या केंद्राची जबाबदारी थांबत नाही, तर त्या व्यक्तीला पुढील उपचारासाठी ए.आर.टी. केंद्राकडे संदर्भित केले जाते. तेथे त्या व्यक्तीची ‘सीडी-फोर’ तपासणीत व्हायरल लोड तपासला जातो. पुढील उपचार मोफत होतात. .एखादी गर्भवती माता एच. आय. व्ही. पॉझिटिव्ह आढळली तर तिच्या पतीचेही समुपदेशन करून एच. आय. व्ही. तपासणी केली जाते. तिच्यापासून तिच्या बाळाला एच आय व्ही. ची लागण होऊ नये म्हणून तिला व बाळाला औषधोपचार केले जातात. त्यानंतर बाळ दीड वर्षाचे होईपर्यंत बाळाची नियमित तपासणी केली जाते व दीड वर्षानंतर त्या बाळाचा जो रिर्पोट असेल, तो ग्राह्य मानला जातो.’’.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.