Sugar mill crisis Maharashtra
esakal
सांगली : देशात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांना आता मोठा ‘ब्रेक’ लागला (ethanol purchase restrictions) आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने आणि तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या निविदांमध्ये इथेनॉल खरेदीवर कडक निर्बंध लादले आहेत. यामध्ये प्रामुख्याने उसाचा रस, सिरप आणि बी-हेवी मळीपासूनच्या इथेनॉलच्या खरेदीवर पूर्णपणे बंदी घातली आहे.