अथणी : कागवाड-मिरज सीमेवर चोख पोलिस बंदोबस्त

जत तालुक्यातील 42 गावाचा विकास खुंटला आहे. शेतीसाठी पाणी द्यावे. कर्नाटकात समावेश करून घ्यावे
police
policeSakal

अथणी : जत तालुक्यातील 42 गावाचा विकास खुंटला आहे. शेतीसाठी पाणी द्यावे. कर्नाटकात समावेश करून घ्यावे. यासाठी जत तालुक्यात आंदोलन पेटले आहे. त्यामुळे सीमाभागातील आंतरराज्य बससेवा स्थगित झाली आहे. रविवार पासून अथणी व कागवाड तालुक्यातील सीमेवरून कडक पोलिस बंदोबस्तात महाराष्ट्रात बससेवा सुरू आहे.

कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न पेटला आहे. त्यामध्ये जत तालुक्यातील 42 गावे आम्हाला कर्नाटकात समावेश करून घ्यावी, अशा या मागणीला जोर वाढल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे. सीमाभागात कडक पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. विशेष करून कागवाड-मिरज सीमेवर कर्नाटकाचे पोलिस सीमेपर्यंत बस बंदोबस्तात पाठवत आहेत. तेथून पुढे सांगली पोलिस बंदोबस्तात सांगलीपर्यंत बस पाठवत आहेत. सध्या आंतरराज्य बससेवा दोन दिवस बंद होती. परंतु रविवारी सकाळपासून बससेवा सुरळीत सुरु झाली आहे. विशेष करून पुणे, मुंबई, नाशिकला जाणाऱ्या बसेस पूर्णपणे बंद आहेत. सध्या वातावरण तणावग्रस्त बनले आहे.

बेळगाव, विजापूर, बागलकोट विभागातील बसेसचे उत्पन्न महाराष्ट्रावर अवलंबून आहे. या आंतरराज्य बससेवा बंद झाल्यामुळे दोन दिवसात लाखो रुपयांचा फटका बसला आहे. त्यामध्ये प्रवाशाची गैरसोय झाली असून कागवाड ते मिरज 100 रुपये खासगी वाहनधारक दर आकारात आहेत. खासगी वाहनधारक प्रवाशाची लूट करीत आहेत. सीमाभागातील बंदच्या काळात प्रवाशांना वेठीस धरले जाते. सीमाभागात वातावरण तणावपूर्ण असले तरी शांतता आहे. सीमेवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com