उमेदवारांनी घरगुती जेवण द्यायला सुरवात केल्याने कार्यकर्त्यांचा प्रचारातून काढता पाय

तात्या लांडगे
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

सोलापूर : निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी खर्चाचे दरपत्रक निश्‍चित केले असून, त्यानुसार चहासाठी चार रुपये, तर पोहे-उपीटसाठी 10 रुपयांचा खर्च करणे बंधनकारक केले.

परंतु, हॉटेलमध्ये कटिंग चहाचा दर पाच रुपये, तर पोहे-उपीटसाठी 15 ते 20 रुपयांचा दर असल्याने उमेदवारांकडून कार्यकर्त्यांना घरगुती जेवण अन्‌ चहा दिला जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर निघू लागला आहे. अनेक कार्यकर्त्यांनी प्रचाराकडे पाठ फिरवल्याने उमेदवारांचीही कोंडी झाली आहे. 

निवडणुकीत नेत्यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते रात्रंदिवस गावोगावी फिरतात. त्यांना उमेदवारांकडून चहा, नाश्‍ता, जेवण दिले जाते. मात्र, निवडणूक आयोगाच्या दरपत्रकानुसार शाकाहारी जेवणासाठी 70 रुपये, तर सामिष भोजनासाठी 140 रुपयांची मर्यादा घालण्यात आली आहे. प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्यांच्या चालकाला प्रतिदिन 500 रुपये द्यावेत, असेही बजावण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीतील उमेदवारासाठी 28 लाख रुपयांची मर्यादा आखून दिली आहे. अर्ज दाखल केल्यापासून उमेदवारांना निवडणूक आयोगाला खर्च सादर करावा लागणार आहे. निवडणुकीनंतर आयोगाचे शुक्‍लकाष्ठ मागे लागायला नको म्हणून उमेदवारांकडून खास व्यक्‍तींमार्फत खर्चाचा ताळमेळ घातला जात आहे. बऱ्याच उमेदवारांनी घरगुती जेवण द्यायला सुरवात केल्याने अनेक कार्यकर्त्यांनी प्रचारातून काढता पाय घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

  • आयोगाच्या दरपत्रकाचा ताळमेळ जुळेना 
  • खर्चाचा ताळमेळ घालण्यासाठी विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती 
  •  प्रचाराच्या गाडीवर 18 तास काम करणाऱ्या चालकांकडून दररोज एक हजाराची मागणी 
  •  चहा किमान पाच रुपयांस तर राइस प्लेटचा दर 80 ते 90 रुपये 
  •  उमेदवारांकडून वांगी, बटाटे, टोमॅटो, गहू, ज्वारी, डाळीची घाऊक दरात खरेदी 
  •  घरगुती जेवणाऐवजी बिर्याणी अन्‌ मांसाहारी जेवणाची मागणी 

निवडणूक आयोगाने दरपत्रक ठरवून दिले; मात्र त्यानुसार बाजारात काहीच उपलब्ध नाही. चहा, नाश्‍ता, शाकाहरी, मासांहारी जेवणाचे दर वाढले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांसाठी घरगुती जेवणाची सोय केली असून, त्यासाठी भाज्या व किराणा माल एकदमच खरेदी केला आहे. - आनंद चंदनशिवे, उमेदवार, वंचित बहुजन आघाडी, सोलापूर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Legislative Assembly Candidates criticize Election Commission