बापरे : गर्दी कशी महा गर्दी सांगलीत नियम धाब्यावर...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

सांगलीत आज सकाळी सात ते अकरा या वेळेत काही ठिकाणी बाजार भरवले आहेत. त्यानंतर लोकांची भाजी खरेदी करण्यासाठी प्रचंड झुंबड उडाली

सांगली : आज पाडवा आहे. त्यामुळे  महापालिका प्रशासनाने शहरातील  दहा ठिकाणी  भाजी केंद्रे उपलब्ध करून दिली.  मात्र सर्वच केंद्रावर  प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  पर्यंत सारेजण गर्दी टाळा  असं सांगतात मात्र  गर्दी कशी महा गर्दी होईल याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. सांगलीत सकाळी बाजार भरला आणि झुंबड उडाली.

सांगलीत आज सकाळी सात ते अकरा या वेळेत काही ठिकाणी बाजार भरवले आहेत. त्यानंतर लोकांची भाजी खरेदी करण्यासाठी प्रचंड झुंबड उडाली. विश्रामबाग येथील स्फूर्ती चौकात नागरिकांनी भाजी खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी केली. विशेष करून कोरोना बाबतीत नियम सांगितले जातात गर्दी टाळा, अंतर ठेवा या कुठल्याच सूचनांचे पालन होताना यामध्ये दिसत नव्हते

हेही वाचा- हत्वाचे...महापालिका क्षेत्रात येथे  मिळणार भाजीपाला -

 गर्दी टाळा, अंतर ठेवा

खरेतर प्रशासनाने लोकांची सोय व्हावी म्हणून आज सांगलीत काही ठिकाणी बाजार भरण्याचे प्लॅनिंग केले. मात्र प्रत्येक ठिकाणी रांगा लागल्या होत्या. त्या रांगेमध्ये किमान प्रत्येक व्यक्ती काही अंतर ठेवून उभी राहिली पाहिजे असा नियम आहे. पण हे नियम पाळले जात नव्हते. काही लोकांनी मास्क लावले होते काही लोकांना त्याचे भान नव्हते. गर्दी टाळा हा मंत्र पंतप्रधान पासून मुख्यमंत्र्यांपर्यंत आव्हान केले जाते. त्याला हरताळ फासण्याचे काम रोज सुरू आहे. आज पाडवा असल्याने सहाजिकच लोकांना गुढीपाडव्याच्या माळा, भाजी, अन्य पदार्थ यांची आवश्यकता भासत होती. पण या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी गर्दी टाळायला हवी ती टाळली जात नाही, असे दृश्य सर्वच ठिकाणी पाहायला मिळत होतं.

 हेही वाचा- भारीच : शाळेला सुट्टी, बट लर्न फ्रॉम होम विथ मल्टिमिडीया.... सुट्टी नाॅट..

नागरिक गर्दी टाळण्याचे भान ठेवत नाहीत
सांगली जिल्ह्यात कोरोणाचे चार रुग्ण आढळले आहेत असे असताना नागरिकांनी गर्दी  टाळण्याचे भान नसणे घातक ठरू शकते याबाबत प्रशासनाने आणखीन कठोर पावलं उचलण्याची गरज आहे. मेडिकल दुकानात देखील औषधे खरेदीसाठी अशीच शंभर पाहायला मिळत आहे. प्रशासनाने सोय चांगली केली आहे पण नागरिक गर्दी टाळण्याचे भान ठेवत नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra lockdown but food market people on road in sangli marathi news