महासंचालनालयाच्या ‘महाराष्ट्र माझा’ स्पर्धेत कोल्हापूर भारी...!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

  • शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धा २०१८ चा निकाल जाहीर
  • नाशिकचे आनंद बोरा स्पर्धेत पहिले, तर जयसिंगपूरचा कृष्णा मासलकरने दुसरा क्रमांक पटकावला. राहुल गुलाणे (यवतमाळ) यांस तिसरा क्रमांक. 

कोल्हापूर - शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धा २०१८ चा निकाल जाहीर झाला असून, या स्पर्धेत येथील छायाचित्रकारांनी मोहोर उमटवली आहे. नाशिकच्या आनंद बोरा यांनी स्पर्धेत पहिला, तर जयसिंगपूरच्या कृष्णा मासलकरने दुसरा क्रमांक पटकावला. राहुल गुलाणे (यवतमाळ) यांनी तिसरा क्रमांक पटकावला.

उत्तेजनार्थ पारितोषिकांसाठी सचिन वैद्य (मुंबई), वीरेंद्र धुरी (मुंबई), प्रशांत खरोटे (नाशिक), दीपक कुंभार (कोल्हापूर), गोपाल बोरकर (हिंगोली) यांची निवड झाली. विजेत्यांना अनुक्रमे २५ हजार, २० हजार, १५ हजार, तर उत्तेजनार्थ पाच पारितोषिकांसाठी प्रत्येकी तीन हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र दर्शन घडावे, यासाठी राज्याच्या प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या विविध महत्त्वाच्या योजनांवर आधारित ही स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेसाठी राज्यभरातून एकवीसशे छायाचित्रे प्राप्त झाली होती. दरम्यान, मासलकर यांनी स्पर्धेसाठी एकूण पाच छायाचित्रे पाठवली होती. दीपक कुंभार यांनी कोल्हापुरी कुस्तीचे छायाचित्र पाठवले होते. त्यांना दुसऱ्यांदा या स्पर्धेत पारितोषिक मिळाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Mazha Photograph competition result