एलएलबी प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना अडचण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

मुंबई - कायदा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असताना ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी मात्र कमी होत नसल्याचे दिसत आहे. एलएलबीच्या प्रवेश प्रक्रियेत प्रत्यक्षात दिलेली माहिती आणि ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आढळलेल्या माहितीत मोठी तफावत असल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागत आहे. 

एलएलबीच्या प्रवेश प्रक्रियेची माहिती देणाऱ्या पुस्तिकेत सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 45 टक्के आणि राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 40 टक्के गुण आवश्‍यक असल्याचे सांगितले जात होते. प्रत्यक्षात ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना सर्वसाधारण विद्यार्थ्यांना किमान 49.50 टक्‍क्‍यांची मर्यादा सांगण्यात आली आहे. पुस्तिकेत या विद्यार्थ्यांना किमान 45 टक्‍क्‍यांची अट असताना ऑनलाईन अर्ज भरताना साडेचार टक्के गुण जास्त सांगितल्याने विद्यार्थी संतापले आहेत. 

तीन वर्षांच्या एलएलबीच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान, निखिल डीसूझा या विद्यार्थ्याला या भोंगळ कारभाराचा फटका बसला आहे. निखिलने प्रवेश पुस्तिका डाऊनलोड केली. त्यात एलएलबी प्रवेशासाठी सर्वसाधारण वर्गातील विद्यार्थ्यांना किमान 45 टक्‍क्‍यांची मर्यादा नोंद आहे. प्रत्यक्षात ऑनलाईन अर्ज दिल्यानंतर तो प्रवेशास पात्र नसल्याची माहिती संकेतस्थळावरून देण्यात आली. 49.50 टक्‍क्‍यांची आवश्‍यकता असल्याने तुम्ही प्रवेशास अपात्र आहात, असे सांगण्यात आले. 

एलएलबी प्रवेशासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 45 टक्‍क्‍यांचीच मर्यादा आहे. सॉफ्टवेअरमध्ये चूक झाली होती. याबाबत 10 विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्या होत्या. आता विद्यार्थ्यांना अडचणी येणार नाहीत. सध्या केवळ नावनोंदणी सुरू आहे. 
- चंद्रशेखर ओक, संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय 

Web Title: maharashtra news LLB admissions

टॅग्स