जत : टपाली मतदानामध्ये विक्रम सावंत आघाडीवर | Election Results

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या जत तालुक्‍याच्या राजकारणाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहीले आहे. सांगली जिल्ह्यातील हा शेवटच्या मतदार संघ नेहमी दुर्लक्षित असला तरी कायम चर्चेत राहिला आहे.

जत -  जत विधानसभा मतदारसंघात सकाळी मतमोजणीला सुरवात झाली. प्रथम टपाली मतदान मोजणी सुरू झाली. यामध्ये काँग्रेसचे विक्रम सावंत आघाडीवर आहेत. 

राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या जत तालुक्‍याच्या राजकारणाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहीले आहे. सांगली जिल्ह्यातील हा शेवटच्या मतदार संघ नेहमी दुर्लक्षित असला तरी कायम चर्चेत राहिला आहे.

तालुक्‍यात काँग्रेसचे विक्रम सावंत, भाजपचे आमदार विलासराव जगताप व स्वाभिमानी विकास आघाडीचे डॉ. रवींद्र आरळी यांच्यात ही लढत होत आहे. प्रचारा दरम्यान सर्वांनी एकमेकांचे आरोप-प्रत्यारोप जाहीर सभेत खोडून काढले. विशेषतः पूर्व भागातील तुबची योजनेचा मुद्दा कळीचा ठरला. 

भाजप व काँग्रेसच्या नेत्यांनी सरळ कर्नाटकातील दिग्गज नेत्यांना प्रचारासाठी धाडल्याने, निवडणूक महाराष्ट्राची अन्‌ जोर कर्नाटकाचा, असाच काही प्रत्यय प्रचारात दरम्यान दिसून आला. 

तालुक्‍यात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी, भाजप व भाजपमध्ये झालेल्या बंडखोरीतून स्वाभिमानी विकास आघाडीची निर्मिती झाली. भाजप विरुद्ध काँग्रेस अशी निवडणूक स्पष्ट होताना तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून तिरंगी लढतीचे चित्र तालुक्‍यात निर्माण झाले. दोन मराठा उमेदवारांच्या विरोधात लिंगायत समाजाच्या उमेदवाराला संधी दिल्याने, ही निवडणूक अटीतटीची व प्रतिष्ठेची ठरत आहे. 

तालुक्‍याचा पूर्व भाग हा गडीनाडू कर्नाटक भाषिक आहेत. तालुक्‍यातील लिंगायत समाजाचे मताधिक्‍य लाक्षणिक व महत्त्वपूर्ण असल्याने या निवडणुकीत भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कर्नाटक राज्याचे  मुख्यमंत्री येडियुरप्पा, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, आदी नेत्यांना तर काँग्रेसवाल्यांनी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, माजी गृहमंत्री आमदार एम. बी. पाटील, जमखंडी आमदार  आनंद न्यामगोंड, कर्नाटक काँग्रेसचे विरोधी पक्षनेते एस. आर. पाटील तर महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार विश्वजित कदम यांना प्रचारासाठी आमंत्रित दिले होते. दुसरीकडे विकास आघाडीने स्थानिक नेत्यांच्या बळावर तालुक्‍यातील प्रचार सभा गाजवल्या.

शनिवारी प्रचारा शेवटचा दिवस असल्याने जत तालुका स्वाभिमानी विकास आघाडीचे सेलिब्रिटी मराठी च्या माध्यमातून मतदारावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न आहे. आमदार जगताप यांनी वंचित गावांना पाणी मिळवून देणे हा एकमेव उद्देश ठेवून मतदारांपुढे आले आहेत. दुसरीकडे विक्रम सावंत यांनी भाजपच्या ध्येय धोरणावर घाला, तुबची- बबलेश्वर योजनेचे पाणी पूर्वभागातील वंचित गावांना मिळू शकते, हे मतदारांच्या लक्षात आणून आपली भविष्यवाणी सत्यात उतरू शकते, हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Sangli Jat trends early morning