Video सातारला राष्ट्रवादीचा जल्लाेष I Election Result 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

लाेकसभा पाेटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील हे उदयनराजे भाेसले यांच्या पेक्षा 60 हजार 867 मतांनी आघाडीवर आहेत.

सातारा - वाई विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे मकरंद पाटील हे पून्हा आमदार हाेणार असल्याचे त्यांनी मिळविलेल्या मतांची आघाडीतून स्पष्ट हाेत आहे. पाटील यांना 35 हजार 304 मतांची 21 व्या फेरी अखेर आघाडी मिळाली आहे. 

पाटील यांच्या विराेधात भाजपने किसन वीर कारखानाचे अध्यक्ष मदन भोसले यांना रिंगणात उतरविले हाेते. शिवसेनेतून इच्छुक असलेले पुरूषोत्तम जाधव यांनी अर्ज मागे घेतल्याने येथे दुरंगी लढत होत आहे.

वाईत दोन लाख 26 हजार 242 (68.26 टक्के) इतके मतदान झाले आहे. या मतदारसंघात मकरंद पाटील यांचा पहिल्यापासूनच मतदारांशी उत्तम संपर्क आहे. मदन भाेसले हे दहा वर्षांत आमच्याशी संपर्कात नाहीत असे मतदारांचे म्हणणे हाेते. त्यांचे हे म्हणणे मतपेटीतून खरे करुन दाखविले आहे. 

21 व्या फेरी अखेर मिळालेली मते 

मकरंद पाटील  - 110105 मते. 

मदन भाेसले - 74809 मते 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Satara trends middle phase