सोलापूर : सोलापुरात यांनी राखली आघाडी I Election Result 2019

तात्या लांडगे
Thursday, 24 October 2019

मोहोळ विधानसभा मतदारसंघात भूमिपूत्र नागनाथ क्षिरसागर हे पिछाडीवर असून यशवंत माने यांनी आघाडी कायम राखली आहे. पंढरपूर- मंगळवेढ्यात भारत भालके हेदेखील आघाडीवर आहेत.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील सुमारे 13 ते 15 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामध्ये सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख (दोन्ही भाजप), आमदार दिलीप सोपल (शिवसेना), नारायण पाटील (अपक्ष), उत्तरमराव जानकर, यशवंत माने (राष्ट्रवादी), शहाजी पाटील (शिवसेना) यांनी आघाडी कायम राखली आहे. कार्यकर्ते आता गुलालाची पोती काढून जल्लोषाच्या तयारीला लागले आहेत.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विजयासाठी त्यांनी कंबर कसली होती. 10 फेऱ्यापर्यंत पिछाडीवर असलेल्या प्रणिती यांनी आता सुमारे सात हजारांपर्यंत आघाडी घेतली आहे. तर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून माढा लोकसभा निवडणूक लढविलेले संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीऐवजी अपक्ष उभारण्याचा निर्णय घेतला. त्यांना माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी साथही दिली. मात्र, करमाळ्यात शिवसेनेने डावलेले उमेदवार नारायण पाटील यांनी आघाडी कायम राखली आहे.

- सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी गड राखणार का?

तर माळशिरसचे उमेदवार उत्तमराव जानकर यांनी ऐनवेळी भाजपला बगल देत राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवली. सांगोल्यात ज्येष्ठ आमदार गणतपराव देशमुख यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला अन्‌ नातू अनिकेत देशमुख यांना उमेदवारी दिली. मात्र, त्याठिकणी माजी आमदार तथा शिवसेनेचे उमेदवार शहाजी पाटील दोन हजारांपर्यंत आघाडीवर आहेत. माढ्यातून आमदार बबनराव शिंदे यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे. बार्शीत राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसेनेने दाखल झालेले दिलीप सोपल आघाडीवर आहेत.

- बारामती : पवारांचा गड अभेद्य; सर्वच उमेदवारांचे डिपाॅझिट जप्त

मोहोळ विधानसभा मतदारसंघात भूमिपूत्र नागनाथ क्षिरसागर हे पिछाडीवर असून यशवंत माने यांनी आघाडी कायम राखली आहे. पंढरपूर- मंगळवेढ्यात भारत भालके हेदेखील आघाडीवर आहेत. तर दक्षिण सोलापुरात सहकारमंत्री सुभाष देशमुख 37 हजारांनी तर शहर उत्तरचे उमेदवार विजयकुमार देशमुख सुमारे 32 हजारांनी आघाडीवर आहेत. अक्‍कलकोट विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार सिध्दराम म्हेत्रे पिछाडीवर असून मुख्यमंत्र्यांचे विश्‍वासू सचिन कल्याणशेट्टी विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.

- शरद पवारांची पत्रकार परिषद; 'या' घोषणांची शक्यता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Solapur trends first phase