Vidhan Sabha 2019 : पंढरपूर मतदारसंघांतून शिवाजीराव काळुंगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

हुकूम मुलाणी
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

आघाडीतील जागा वाटपाच्या घोळातुन काँग्रेस पक्षाच्या वतीने रात्री उशिरा जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीतील पंढरपूर मतदारसंघांतून शिवाजीराव काळुंगे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

विधानसभा 2019 : मंगळवेढा - आघाडीतील जागा वाटपाच्या घोळातुन काँग्रेस पक्षाच्या वतीने रात्री उशिरा जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीतील पंढरपूर मतदारसंघांतून शिवाजीराव काळुंगे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

आघाडीच्या जागावाटपात 2009 पर्यंत पंढरपुर जागाही राष्ट्रवादी काँग्रेस होती. पण रिडालोस मधून विजयी झालेले आ. भारत भालके यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे ही जागा कॉंग्रेसला देऊ केली. आ. भालके पुन्हा विजयी झाले, परंतु त्यांच्या विजयात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे मोठे योगदान ठरले आहे. परंतु पाच वर्षांच्या काळामध्ये काँग्रेस मधील काही कार्यकर्त्यांनी आ. भालके यांच्यापासून अंतरावर राहिले काँग्रेस पक्षाचे संघर्ष यात्रेत ही गटबाजी अधिक प्रमाणात दिसून आली. परंतु ही गटबाजी रोखण्याच्या दृष्टीने माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले नाही. उलट गटबाजीला खतपाणी घालण्याचे प्रयत्न केले. असा आरोप आ. भालके समर्थकांनी केला. अशा परिस्थितीत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदे यांच्या प्रचारात एकही वक्ता न येता प्रचाराची जबाबदारी आ. भालके यांनी पार पाडली.

सत्ताधारी पक्षाच्या निष्क्रिय कामावर प्रहार केल्यामुळे पंढरपूर मतदारसंघातून साडेसात हजार मताधिक्य दिले. परंतु शिंदे समर्थक काॅग्रेस कार्यकर्ते सुशीलकुमार शिंदे वगळता इतर कोणत्याही वेळी काँग्रेस बरोबर नसल्याचे दिसून येत होते . यांत आ. भालकेची काँग्रेस पक्ष सोडण्याची मानसिकता तयार होत गेली. नुकताच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उमेदवारी अर्ज आज दाखल करणार असल्याचे जाहीर केले होते. काँग्रेस पक्षाने या यादीत शिवाजीराव काळुंगे यांचे नाव जाहीर केले होते.

आघाडीतील जागावाटपाचा घोळ पंढरपुरातून उघड झाल्यामुळे कार्यकर्त्यांनी युती धर्म पाळायचा की नाही असे संकट काँग्रेसच्या नेत्यांनी आणून ठेवले आहे यावर काय तोडगा निघतो, की आघाडीत बिघाडी होते, याकडे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhansabha 2019 Shivajirao Kalunge Form Politics