#MaharashtraBandh पंढरपुरात आर सी एफचे जवान दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र बिंदू ठरलेल्या पंढरपुरात प्रथमच केंद्राच्या आर.सी.एफ दलाचे सुमारे 200 जवान दाखल झाले आहेत. मराठा आरक्षण  आंदोलना दरम्यान पंढरपुरात एस. टी. बस गाड्यांची मोठ्या प्रमाणावर तोड फोड झाली होती. आषाढी महापुजेसाठी मुख्यमंत्र्यांना येवू न देण्याचा इशारा देखील येथूनच देण्यात आला होता.

पंढरपूर - मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र बिंदू ठरलेल्या पंढरपुरात प्रथमच केंद्राच्या आर.सी.एफ दलाचे सुमारे 200 जवान दाखल झाले आहेत. मराठा आरक्षण  आंदोलना दरम्यान पंढरपुरात एस. टी. बस गाड्यांची मोठ्या प्रमाणावर तोड फोड झाली होती. आषाढी महापुजेसाठी मुख्यमंत्र्यांना येवू न देण्याचा इशारा देखील येथूनच देण्यात आला होता.

ठिय्या आंदोलना नंतर उदया सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. बंद दरम्यान, पंढरपुरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रॅफीड ऍक्शन फोर्सचे (दुत कार्य बल) सुमारे दोनशे जवान दाखल झाले आहेत.

गुजरात दंगली दरम्यान अत्यंत कौशल्याने जमावावर निय॔त्रण ठेवलेल्या अहमदाबाद येथील या जवानांना खास पाचारण करण्यात आले आहे. आज संध्याकाळी या जवानांनी फेरी मारू मारून शहरातील माहिती घेतली.

Web Title: MaharashtraBandh RCF troops in Pandharpur