‘अहिंसा परमो धर्म’चा संदेश

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 एप्रिल 2017

सांगली - ‘अहिंसा परमो धर्म’चा संदेश देणारे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. शहर आणि परिसरातील विविध संघटना, ग्रुपतर्फे धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजनही यानिमित्ताने करण्यात आले. शहरातून विविध संघटनांनी एकत्रितपणे काढलेली शोभायात्रा लक्षवेधी ठरली. 

 

सांगली - ‘अहिंसा परमो धर्म’चा संदेश देणारे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. शहर आणि परिसरातील विविध संघटना, ग्रुपतर्फे धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजनही यानिमित्ताने करण्यात आले. शहरातून विविध संघटनांनी एकत्रितपणे काढलेली शोभायात्रा लक्षवेधी ठरली. 

 

भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. यात दिगंबर, श्‍वेतांबर, बोगार, कासार या पंथांच्या धर्मीयांचा मोठा सहभाग होता. सकाळी आठ वाजता यात्रेला सुरवात झाली. यात्रेत चित्ररथ, घोडे, चांदीचा रथ, आकर्षक सजवलेली महावीर यांची प्रतिमा, पंचमेरू यांचा समावेश होता. युवक, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग यात होता. दिगंबर जैन बोर्डिंग व जैन महिलाश्रमचे विद्यार्थी फेटे बांधून पारंपरिक पोशाखात सहभागी झाले होते. भगवान महावीरांच्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमला. लेझीम नृत्याचे सादरीकरण झाले. जैन मंदिरात सकाळी दुग्धाभिषेक, पूजा असे धार्मिक कार्यक्रम झाले.

श्री अमिझरा पार्श्‍वनाथ देहरासर ट्रस्ट व जैन सोशल ग्रुपतर्फे येथील कच्छी जैन भवनमध्ये रक्तदान शिबिर झाले. त्यात परिसरातील अडीचशेवर नागरिकांनी रक्तदान केले. हिंदरत्न प्रकाशबापू रक्तपेढीने संकलन केले. शासकीय रुग्णालय, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, रिमांड होम येथे अन्नदान व फळवाटपाचाही कार्यक्रम झाला. माजी महापौर सुरेश पाटील, रावसाहेब माणकापुरे, दक्षिण भारत जैन सभेचे उपाध्यक्ष रावसाहेब पाटील, महामंत्री शांतिनाथ नंदगावे, माजी उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, शांतिनाथ पाटील, प्रा. राहुल चौगुले, प्रमोद पाटील, कुसुम चौधरी, ऋषभ चिमड, ऋषी ऐरवाड, महावीर कोले, भाऊसाहेब पाटील, सतीश आरवाडे, सुजित पाटील, राजीव लेले, नितीन पाटील, ॲड. मदन पाटील, छाया कुंभोजकर, स्वाती कोल्हापुरे, कमल मणचे, अनिता पाटील, सुनीता चौगुले, विजया कर्वे, चांदनी आरवाडे, मीना घोदे उपस्थित होते. कुपवाडच्या अरिहंतनगरमधील शीतलनाथ दिगंबर जैन मंदिरतर्फे पालखी सोहळा झाला. मंदिरात पहाटेपासून मंगल वाद्य घोष, पूजा, नामकर सोहळा असे कार्यक्रम झाले. महिला मंडळाच्या सुमती चिमड, विजया वाझे, कांचन मोने, मंगल धरणगुत्ते, मंगल पाटील, पुष्पा पाटील, शकुंतला आडमुठे, आक्काताई जनाज यांनी संयोजन केले. सुकुमार धरणकुते, सुकुमार खोत, अनंत चिमड, मंदिर कमिटी जिनेश्‍वर पाटील, अभिजित चिमाण्णा, प्रदीप चौगुले, किरण सूर्यवंशी, उमेश पाटील  उपस्थित होते. 

मिरज पश्‍चिम भागात उत्साह 
तुंग - येथील आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात पहाटे जलाभिषेक झाला. त्यानंतर भगवान महावीरांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. ‘महावीर जन्मला ग सखे...’ या काव्यांनी सारा परिसर मंत्रमुग्ध झाला. जयंतीनिमित्त दुपारी रांगोळी स्पर्धा झाल्या. तसेच सायंकाळी पालखीची फेरी गावातील प्रमुख मार्गाने काढली. त्यानंतर पूजाविधानाचा कार्यक्रम झाला. वीर सेवा दल, वीर महिला मंडळ, पंच कमिटी, दिगंबर जैन समाज सेवा ट्रस्ट यांच्यातर्फे संयोजन करण्यात आले. 

Web Title: mahaveer jayanti

टॅग्स