शिवसेना नेत्याच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपीसह सहाजण गजाआड 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

भोजडे (ता. कोपरगाव) येथे सायंकाळी शिवसेनेचे तालुका उपप्रमुख सुरेश श्‍यामराव भोजडे यांच्या घराजवळ रवी शेटे व विजय खर्डे यांच्या साथीदारांनी गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून निघृण हत्या केली. याबाबत कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

नगर : कोपरगाव तालुका शिवसेनेचे उपप्रमुख सुरेश गिऱ्हे यांच्या हत्यप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी रवींद्र शेटे याच्यासह सहा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काल रात्री धुळे येथून ताब्यात घेतले. 

रवींद्र आप्पासाहेब शेटे(वय 39, रा. रामवाडी संवत्सर, ता. कोपरगाव), विजय बाळासाहेब खर्डे(वय 31, रा. पढेगाव चौकी, संवत्सर, ता. कोपरगाव), अमोल सोपानराव मते(वय 33 रा. लाडगाव, रोड वैजापूर), साईनाथ वाल्मिक मते(वय 30, रा. पारेगाव रोड, येवला), रवींद्र जालिंदर मगर(वय 25, रा. वाघवस्ती शिर्डी), लोकेश राय्यप्पा मुद्दापूर (वय 26, रा.नानेकर चाळ, खेड, जि. पुणे), सुनील पंढरीनाथ नागवे(वय 29, रा. सोमठाणा, ता. बदनापूर, जि. जालना) अशी आरोपींची नावे आहेत.

अधिक माहिती अशी, भोजडे (ता. कोपरगाव) येथे सायंकाळी शिवसेनेचे तालुका उपप्रमुख सुरेश श्‍यामराव भोजडे यांच्या घराजवळ रवी शेटे व विजय खर्डे यांच्या साथीदारांनी गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून निघृण हत्या केली. याबाबत कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपास रवी शेटे याचे साथीदार नितीन अवचिते, शरद साळवे, रामदास वलटे, आकाश गिरी यांना अटक केली. सध्या ते पोलिस कोठडीत आहेत. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी धुळे जिल्ह्यात लपून बसल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काल रात्री धुळे जिल्ह्यात सापळा लावून वरील आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता गुन्हा करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील साथीदारांना बोलावून त्यांना पैशाचे आमिष दाखून सुरेश भोजड यांचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली.

आरोपींना जेवण्यासाठी, राहण्यासाठी, पळून जाण्यासाठी अन्य आरोपींनी वाहने पुरविली. त्यामुळे पोलिसांनी अन्य आरोपींना अटक केली. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक शिरीषकुमार देशमुख, पोलिस उपनिरीक्षक गणेश इंगळे, बाळासाहेब मुळीक, मनोहर, गोसावी, दत्तात्रेय गव्हाणे, रवींद्र कर्डिले, राम माळी, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, बबन बेरड यांच्या पथकाने केली. 

पंधरा दिवसांत आखला खुनाचा कट 
आरोपी रवींद्र शेटे आणि विजय खर्डे यांनी सुरेश भोजडे यांचा खून करण्यासाठी पंधरा दिवस तयार केली. शिर्डी, पुणतांबा फाटा, लौकी दहिगाव, वैजापूर, संवत्सर आदी ठिकाणी हॉटेल्समध्ये बसून आणि आरोपीच्या घरी बैठक टाकून आरोपींनी खुनाचा कट रचला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Main accused arrested in Suresh Gire murder