शिवरायांच्या परंपरागत तख्तालाही करा वंदन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

कोल्हापूर  - छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा सोहळा जल्लोषात होत आहे. एखाद्या राष्ट्रीय सणाचे स्वरूप त्याला आले आहे. शिवरायांबद्दल आस्था व्यक्‍त करण्याची जरूर ज्याच्या त्याच्या परीने धडपड आहे; पण या निमित्ताने छत्रपती शिवरायांचे परंपरागत तख्त मात्र सार्वजनिक सोहळ्यापासून तसे अलिप्त राहिले आहे. 

राजघराण्याच्या वतीने या तख्ताचा पूर्ण सन्मान राखला जातो, हे खरे आहे; पण आज करवीरवासीयांना शिवरायांच्या या तख्ताला केवळ शिवजयंतीला नव्हे, तर नेहमी वंदन करण्याची संधी आहे. 

भवानी मंडपात भवानी मंदिरालगत अतिशय श्रद्धेने हे तख्त जपले गेले आहे. हे तख्त म्हणजे सिंहासन नव्हे, तर पन्हाळगडावर ज्या बैठकीवर छत्रपती शिवराय बसत होते, ते आसन म्हणजे हे तख्त.  भवानी मंडपातील या तख्तास खूप आदरयुक्‍त मान आहे. लाकडी बैठकीच्या स्वरूपात असलेल्या तख्तावर जरीचे वस्त्र झाकले आहे. ज्या ज्या वेळी संस्थानचे समारंभ होतात, त्यावेळी पहिल्यांदा राजघराण्यातील व्यक्‍ती या तख्तालाच वंदन करतात. त्यावेळी चोपदार छत्रपती महाराजोंका ताज तख्त, दायमा सर सब्जता, बाण द्रक्षाण रही जियो, महाराज छत्रपती हिंदू पदपातशहा अशी ललकारी देतात. दसरा चौकात सोने लुटण्याचा सोहळा झाल्यानंतर शाहू महाराज व त्यांचा परिवार जेव्हा भवानी मंडपात येतो, तेव्हा या तख्ताला सोने अर्पण करतात. या तख्ताजवळ कायम निरंजन तेवत ठेवलेले आहे. या तख्ताला जुने जाणकार लोक इतका मान देतात, की तख्ताला ते पाठ दाखवणे म्हणजे तख्ताचा अवमान समजतात व काही पावले पाठमोरी चालत जाऊन ते पुढे निघून जातात. 

या तख्ताभोवती छोटे लाकडी कठडे उभे केले आहे. याच तख्ताजवळ करवीर संस्थानच्या ताराराणींचे तख्त आहे. छत्रपती शहाजी महाराज यांच्या काळापर्यंत भवानी मंडपात ज्यावेळी दसऱ्याचा दरबार भरत असे, त्यावेळी शहाजी महाराज या शेजारच्या तख्तावर बसत होते. 

शिवरायांशी एवढी जवळीक
हे तख्त आजच प्रकाशात आले असा भाग नाही. खूप आदराची मोठी परंपरा या तख्ताला आहे. ती पाळलीही जात आहे; पण शिवजयंती म्हणजे केवळ जल्लोषी मिरवणूक, डॉल्बी, मोटारसायकलींचा झंझावात अशा वातावरणात या तख्ताला वंदन केले तरी ते खूप मोलाचे ठरेल. कारण महाराणी ताराराणींनी स्थापित केलेले करवीर संस्थान पन्हाळगडावरून कोल्हापुरात आले. त्यावेळेपासूनचे हे खुद्द छत्रपती शिवरायांचे तख्त आहे. यापेक्षा आणखी शिवरायांची जवळीक आपल्याला कोठे साधता येणार आहे?

Web Title: Make a tribute to the traditional board of Shivaraya