कऱ्हाडला गुरू रामदेवबाबांचे योग शिबिर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

मलकापूर - योगगुरू रामदेवबाबा यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात प्रथमच कऱ्हाड येथे ता. १४ ते १६ एप्रिल या कालावधीत येथील शिवाजी स्डेडियमवर तीन दिवसीय नि:शुल्क योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सुमारे २०० देशांमध्ये थेट प्रक्षेपण होणार असल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी भारत स्वाभिमानचे राज्य प्रभारी बापू पाडळकर, कोल्हापूर जिल्ह्याचे प्रमुख शेखर खापणे, जिल्हाध्यक्ष नीलेश पिसाळ, प्रदीप तांबवेकर, अनुपमा कोरे उपस्थित होते. श्री. भोसले म्हणाले, ‘‘या शिबिरास सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांसह इतर भागातूनही अनुयायी दाखल होणार आहेत. २० हजार लोक एकावेळी शिबिरात सहभागी होतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

तीन दिवस रोज पहाटे पाच ते साडेसात या वेळेत रामदेवबाबांच्या उपस्थितीत योगासने होणार आहेत. त्याशिवाय १४ एप्रिलला चार ते साडेसहा या वेळेत रेठरे येथे कृष्णा साखर कारखाना कार्यस्थळावर विशेष शेतकरी मेळावा होईल.

विषमुक्त शेती व शेतीतून उत्पन्न वाढीसाठी कराव्या लागणाऱ्या प्रयोगाबाबत रामदेवबाबा मार्गदर्शन करतील. ता. १५ एप्रिलला सकाळी ११ वाजता कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांगणात ‘युवा भारत’अंतर्गत रामदेवबाबांचा युवकांशी थेट संवाद होणार आहे. दुपारी चार वाजता स्टेडियमवर भगिनींसाठी महिला मेळावा होणार आहे. ता. १६ रोजी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक व आशीर्वाद कार्यक्रमानंतर शिबिराचा समारोप होईल. या योग शिबिरात सकाळी नऊ ते चार यावेळेत मोफत चिकित्सा करण्यात येणार आहे.

Web Title: malkapur news guru ramdevbaba yog camp