
Assault in Kadegaon after ₹32 lakh investment loss; police register FIR."
Sakal
कडेगाव : येथे शेअर मार्केटमध्ये ३२ लाखांचा तोटा झाल्याच्या रागातून चिडून एकाने शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत गणेश धनाजी माळी (वय २७, कडेगाव) यांनी कडेगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. गजानन माणिकराव केंद्रे (मूळ आंबेजोगाई, जि. बीड; सध्या विहापूर, ता. कडेगाव) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १६) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.