महिला डॉक्‍टरांवर हल्ला करणाऱ्यास कोठडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

सोलापूर - शासकीय रुग्णालय परिसरातील महिला डॉक्‍टरांच्या घरात घुसून चाकूने हल्ला केल्याप्रकरणी सागर प्रदीप कापुरे (वय 19) या युवकाची दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

सोलापूर - शासकीय रुग्णालय परिसरातील महिला डॉक्‍टरांच्या घरात घुसून चाकूने हल्ला केल्याप्रकरणी सागर प्रदीप कापुरे (वय 19) या युवकाची दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

डॉ. रूपाली अशोक घोरपडे यांनी फिर्याद दिली आहे. शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असणाऱ्या डॉ. घोरपडे, डॉ. दीपमाला शिवाजी कारंडे आणि डॉ. निकिता या तिघी चाकू हल्ल्यात जखमी झाल्या आहेत.

मंगळवारी रात्री सागर कापुरे याने दरवाजा वाजवून मी तुमच्या मालकाच्या घरी काम करतो, दार उघडा असे म्हणून आत प्रवेश केला. दार उघडताच चाकूने हल्ला केला.

Web Title: Man Police Custody who attacked the female doctor Crime