नोटा बदलण्याच्या दबावामुळे व्यवस्थापकाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

सांगली  - चलनबाह्य नोटा बदलण्यासाठी दबाव आल्याने फलटण (जि. सातारा) येथील जवाहर श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे प्रकल्प व्यवस्थापक सुनील गजानन पुजारी (वय 49, रा. इचलकरंजी) यांनी आत्महत्या केल्याचे आज निष्पन्न झाले. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फलटणमधील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक मनोहर गोपाळ जोशी (मूळ रा. पुणे, सध्या फलटण) व कामगार हणमंत गंगाराम मुळीक (वय 50, रा. फलटण) अशी त्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोलिस जातील, अशी माहिती उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

अधिक माहिती अशी, की पुजारी मूळचे इचलकरंजीचे रहिवासी आहेत. हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर सहकारी साखर कारखान्यात ते व्यवस्थापक होते. कारखान्याच्या संचालक मंडळाने 2008 मध्ये फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखाना चालवण्यास घेतला. त्यानंतर पुजारी हेदेखील 2008 पासून जवाहर श्रीराम सहकारी साखर कारखान्यात प्रकल्प व्यवस्थापक म्हणून रुजू झाले.

दरम्यान, पुजारी यांनी 13 जानेवारीला सांगली बस स्थानक रस्त्यावरील तृप्ती लॉजमध्ये विष पिऊन आत्महत्या केली. या वेळी घटनास्थळी पुजारी यांनी लिहिलेली सहा पानी चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

डॉ. काळे म्हणाल्या, ""चिठ्ठीत मनोहर जोशी आणि हणमंत मुळीक यांची नावे होती. त्यानुसार आम्ही सखोल चौकशी केली. त्यात मनोहर जोशी यांनी कारखान्यातील तीन कोटी रुपयांची चलनबाह्य झालेली रक्कम "व्हाइट' करण्यासाठी पुजारी यांना सांगितले. त्यांनी त्यातील सव्वा कोटी रुपयांची रक्कम व्हाइट केली. उर्वरित रक्कम व्हाइट करणे त्यांना शक्‍य झाले नाही. यासाठी जोशी याने वारंवार दबाव आणला; तर कामगार हणमंत मुळीक याने वारंवार त्रास दिला. चौकशीत याची सत्यता सिद्ध झाल्याने जोशी व मुळीक या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.''

Web Title: manager suicide