पेट्रोल पंपावरील व्यवस्थापकाचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आणि मानसिक त्रासाला कंटाळून पेट्रोल पंपावरील व्यवस्थापनाने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. राजू पांडुरंग वावरे (वय 43, रा. भगतसिंग वसाहत, कसबा बावडा) असे त्यांचे नाव आहे. 

कोल्हापूर - आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आणि मानसिक त्रासाला कंटाळून पेट्रोल पंपावरील व्यवस्थापनाने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. राजू पांडुरंग वावरे (वय 43, रा. भगतसिंग वसाहत, कसबा बावडा) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे अशी - बाजीराव महादेव पाटील, शहाजी श्रीपती पाटील, शिवराज ऊर्फ अनिकेत बाजीराव पाटील, अनिरूद्ध पाटील (सर्व रा. कसबा बावडा)

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, राजू वावरे हे कसबा बावडा येथील संशयित बाजीराव, शहाजी शिवराज, अनिरुद्ध पाटील यांच्या पेट्रोल पंपावर व्यवस्थापक म्हणून नोकरी करत होते. नोकरीच्या काळात हिशेबात 15 ते 20 लाख रूपयांचा घोटाळा वावरे यांनी केल्याचा आरोप पाटील कुटुंबातील चारही संशयितांनी केला. त्या पैशाच्या वसुलीसाठी त्यांना या चौघांकडून मानसिक त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून त्यांनी चार ऑगस्टला सीसीआरसमोरील कसबा बावडा केएमटी बसस्थानकाच्या स्टॅंन्डमध्ये विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना उपचारासाठी सीपीआर व तेथून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांनी दिलेल्या जबाबानुसार चौघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास पोलिस करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Managers attempt to commit suicide by drinking poison