बेळगाव : मंगाई देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी     

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

बेळगाव - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वडगाव येथील मंगाई देवीच्या यात्रेला सुरवात झाली आहे. देवीच्या दर्शनासाठी रात्री 12 वाजल्यापासूनच शहरातील भाविकांनी मोठी गर्दी केली असून पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत.  

पावसाची आणि शेतकऱ्यांची जत्रा म्हणून ओळख असणाऱ्या मंगाई देवीच्या यात्रेसाठी एक महिना अगोदर गाऱ्हाणे घालण्याची परंपरा आहे. तर यात्रे दिवशी सकाळी पारंपरिक पद्धतीने गाऱ्हाणे उतरविल्यानंतर भर यात्रेस सुरवात होते. नवस फेडण्यासाठी अनेक भाविक मंदिरावर कोंबडीची पिले उडवितात. त्यामुळे पिले विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी वडगाव भागात गर्दी केली आहे. 

यात्रा काळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे. तसेच ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावले आहेत. दिवसभरात दोन लाखांहून अधिक भाविक दर्शनाचा लाभ घेतील, अशी माहिती मंदिर पंच कमिटीच्यावतीने देण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी फक्त वडगाव भागापूर्ती मर्यादित असणारी मंगाई देवीची यात्रा संपूर्ण बेळगाव शहराची यात्रा म्हणून ओळखली जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mangai Devi Yatra Belgaum